Panvel Slab Collapse Injury | पनवेलमध्ये धास्ती! माणिकनगर येथील इमारतीचा स्लॅब कोसळून एक जण गंभीर जखमी

Panvel Slab Collapse Injury | पनवेल शहरातील परदेशी आळी परिसरातील माणिकनगर येथील इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना शनिवारी घडली.
Panvel Slab Collapse Injury
Panvel Slab Collapse Injury
Published on
Updated on

पनवेल : पुढारी वृत्तसेवा
पनवेल शहरातील परदेशी आळी परिसरातील माणिकनगर येथील इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना शनिवारी घडली. या घटनेत सी-विंगमधील रूम क्रमांक २०२ मध्ये राहणारे शैलेशकुमार वाझा हे जखमी झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Panvel Slab Collapse Injury
Panvel Nanded Express Accident: पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला जनावरांची धडक; ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेशकुमार वाझा हे घरात असताना अचानक छताचा सिमेंटचा स्लॅब खाली कोसळला. स्लॅबचा मोठा भाग अंगावर पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्या हात आणि पायांना जखमा झाल्या आहेत. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे इमारतीतील तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रहिवाशांनी तातडीने मदतकार्य करत त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जखमी वाझा यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले आहे.


या घटनेनंतर माणिकनगर परिसरातील नागरिकांमध्ये इमारतींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. इमारतीची दुरावस्था, जुन्या बांधकामांची स्थिती आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोकादायक अथवा जीर्ण इमारतींची प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news