

नेरळ ः नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील नेरळमधील राहणाऱ्या एका तरूणीचे एआयचा वापर करून सोशल मिडियाच्या माध्यमातून खोटे लग्नाचे फोटो वायरल करून, त्या तरूणीची बदनामी करण्याऱ्या तंत्र शिक्षित तरूणाच्या सायबर पोलीस टीमच्या मदतीने नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
नेरळ हद्दीत एका पिडित तरुणीचे खोटे लग्नाचे फोटो हे एआयच्या माध्यमातून एडिटिंग करून ते अज्ञात व्यक्तीचे नावाचा वापरातून खोटे सोशल मिडियाचे इंस्टाग्राम अकाउंट तयार करून वायरल करून, त्या पिडित तरूणीची बदनामी कारक संदेश टाकून तसेच तिला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटनेसंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयासंदर्भात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे व त्यांचे पोलीस टीमने छ्डा लावण्यासाठी सायबर पोलीस विभागाच्या सहकार्यातून तांत्रिक तपास सुरू केला असता, इंस्टाग्राम अकाउंट आयपी ऍड्रेस व वापरले उपकरण शोधण्याच्या प्रयत्नातून आरोपीचा शोध घेतला. काही दिवसाच्या तपासानंतर सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध लागताच पोलीस हवालदार सचिन वाघमारे आणि विनोद वागणेकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून आरोपीला ताब्यात घेत अरोपीची पोलीस चौकशी केली असता, आरोपीचे नाव प्रसाद जगन्नाथ वास्ते असे समोर आले आहे.
तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहाणार असून तो सध्या महाड येथे वास्तव्यस असल्याचे व तो उच्चशिक्षित असून, इंजिनिअर करीत असल्याचे समोर आले आहे. तर तो कम्प्युटर क्षेत्रातून ए आयची प्रॅक्टिस करत असून फोटो बनवण्याचे प्रयत्न करत आहे. पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. तो मागील दोन वर्षांपासून पीडित तरुणीची बदनामी करत होता. खोटे अकाउंट वरून तिच्या नावाने खोटे फोटो व मजकूर व्हायरल करत होता.
इतकेच नाही तर त्याच घरातील तीन जणांच्या नावाने वेगवेगळी बनावट अकाउंट तयार करून पोस्ट टाकत होता. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध कलमानुसार आरोपी प्रसाद जगन्नाथ वास्ते यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडे आहे.
नेरळ पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आला आहे की एआयच्या माध्यमातून तयार होणाऱ्या बनाव फोटो व्हिडिओवर विश्वास ठेवू नये अशा संशयास्पद प्रकरणाची माहिती त्वरित पोलिसांकडे द्यावी.