

खोपोली ः खोपोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडू्न डॉ.सुनिल पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.तशी घोषणा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शनिवारी केली. अखेर नगराध्यक्षपदाची तिढा सुटला असला तरी नाराज इच्छुक उमेदवार मसुरकर आणि मंगेश दळवी यांची मनधरणी करण्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी झाले का अशी विचारणा होत आहे.
नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,माजी नगरसेवक मंगेश दळवी यांनी दावा केला होता.त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत राहिली असतानाही नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार जाहीर नसल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम होता.निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदरांपर्यत पोहचणार अशी आडचण होती.अखेर घारे यांनी खोपोली शहरातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
याप्रसंगी जिल्हा संघटक पंकज पाटील,विधानसभा अध्यक्षा अश्विनी पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, जे.पी.पाटील, मनेष यादव,रमेश जाधव,दिनेश जाधव ,राहुल जाधव,निलेश औटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पक्षनेतृत्वाने मला दिलेली जबाबदारी मी प्रमाणिकपणे स्विकारली असून खोपोलीच्या सर्वागीण विकासासाठी निवडणूक लढत असल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.सुनील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि खोपोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे. भाजपही आमच्या सोबत येईल असा आम्हाला विश्वास आहे. खोपोलीमध्ये ठाकरे शिवसेना,शेकाप, आणि घटक पक्षांना सोबत घेवून निवडणूक लढणार आहोत .
सुधाकर घारे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी