Navi Mumbai Airport Cargo Service: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ चे लँडिग; हवाई मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल

या कामगिरीमुळे नवी मुंबई विमानतळाने देशाच्या हवाई मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
Navi Mumbai Airport Cargo Service
Navi Mumbai Airport Cargo ServicePudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाच्या प्रवासात शनिवारी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला.

विमानतळावर पहिल्या मालवाहू (कार्गो) विमानाचे यशस्वी लँडिंग होत अधिकृत कार्गो सेवेला प्रारंभ झाला. या कामगिरीमुळे नवी मुंबई विमानतळाने देशाच्या हवाई मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

इंडिगो एअरलाइन्सचे इंडिया गो कार्गो हे मालवाहू विमान बंगळुरू येथून उड्डाण करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या दाखल झाले. या यशस्वी लँडिंगनंतर इंडिगो ही नवी मुंबई विमानतळावर

जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क

विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील औद्योगिक पट्टा, जेएनपीए बंदर, तळोजा, पनवेल, उरण आणि रायगड परिसरातील उद्योगांना या कार्गो सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. निर्यात-आयात प्रक्रिया अधिक वेगवान होण्यास मदत होणार असून जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क अधिक मजबूत होईल.

Navi Mumbai Airport Cargo Service
NCMC Smart Card: एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ; परिवहन विभागाचा महत्त्वाचा निर्णय

कार्गो ऑपरेशन्स सुरू करणारी पहिली एअरलाइन ठरली आहे.

सुमारे १८ वर्षे जुने असलेले व्हीटी आयकेएक्स (फ्लाइट 6E9031) हे विमान धावपट्टीवर उतरल्यावर कार्गो टर्मिनलकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर हेच विमान नवी मुंबईहून संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहकडे आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा सुरू झाल्याने महाराष्ट्रासह देशातील उद्योग, निर्यातदार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून मालवाहतूक सेवा सुरू करणारी इंडिगो ही पहिली एअरलाइन ठरली असून, नवी मुंबईहून शारजाहसाठी थेट आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचीही ही पहिलीच झेप ठरली आहे.

Navi Mumbai Airport Cargo Service
Raigad Political Row: महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमात सेना-राष्ट्रवादीत रंगले मानापमान नाट्य; कार्यक्रमातील प्रोटोकॉलवरून तटकरे संतापले

या कार्गो सेवेमुळे तळोजा, पनवेल, उरण, रायगड आणि जेएनपीए परिसरातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. आयात-निर्यातीला वेग, लॉजिस्टिक्स खर्च व वेळेत बचत आणि जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीला नवी दिशा मिळण्याबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि कार्गो हब म्हणून विकसित होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

नवी मुंबई विमानतळावर सुरू झालेली पहिली कार्गो सेवा ही केवळ विमानतळाच्या विकासातील महत्त्वाची पायरी नसून, मुंबई महानगर प्रदेशाच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षमतेला मिळालेली नवी ताकद मानली जात आहे.

बंगळुरू–नवी मुंबई–शारजाह या मार्गामुळे देशांतर्गत मालवाहतूक थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडली जाणार असून, विशेषतः वेगाने पाठविणे आवश्यक असलेल्या मालासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई विमानतळाची सांगड घातल्यास रायगड, पनवेल, तळोजा आणि उरण परिसरातील उद्योगांसाठी मल्टिमोडल लॉजिस्टिक्सचे मोठे केंद्र विकसित होऊ शकते.

विमानतळावरील कार्गो सुविधांचा विस्तार झाल्यास निर्यातदार, आयातदार, औद्योगिक कंपन्या आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होणार असून, नवी मुंबईची ओळख भविष्यात महाराष्ट्राचे महत्त्वाचे कार्गो गेटवे म्हणून निर्माण होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीएची जवळीक ही या संपूर्ण व्यवस्थेची मोठी जमेची बाजू ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news