Mumbai charas seizure : १० कोटींच्या चरसचा पुरवठादार जेरबंद; मुंबई गुन्हे शाखेची बिहारमध्ये कारवाई

नेपाळला पसार होण्याआधी आरोपी गजाआड
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईत तब्बल १० कोटी ९ लाख रुपये किमतीचा १० किलो ९० ग्रॅम चरस जप्त केल्यानंतर या अमली पदार्थाच्या पुरवठ्याचा धागा थेट बिहारपर्यंत पोहोचला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) वरळी युनिटने बिहार पोलिसांच्या मदतीने कारवाई करत कथित पुरवठादाराला अटक केली. जाकीर हुसेन मोहम्मद इसाक (५६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौलचा रहिवासी आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान तो नेपाळला पसार होण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले.

एएनसीच्या वरळी युनिटने १७ ऑगस्ट रोजी वांद्रे पूर्व येथील वांद्रे टर्मिनस परिसरात कारवाई केली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० किलो ९० ग्रॅम चरस आढळून आला. या अमली पदार्थाची किंमत तब्बल १० कोटी ९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
RTO Marathi language inspection : मराठी शिकवणारे वर्ग १३ दिवसांपासून बंद

चौकशीतून पुरवठादाराचा माग

चरससह पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याला हा अमली पदार्थ पुरविणाऱ्या व्यक्तीबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार एएनसीच्या वरळी युनिटने तपासाची दिशा बिहारकडे वळवली. पोलिस अधिकारी किरण वाघ आणि रोहित साळवी यांच्यासह पथक बिहारला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल परिसरात संशयित आरोपी जाकीर हुसेनचा शोध घेण्यात आला.

ही कारवाई अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-शृंगी यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरळी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला.

Crime News
BMC cleanliness drive : स्वच्छ मुंबईसाठी एफडीएच्या धरतीवर काम करावे लागेल

नेपाळला पळण्याच्या तयारीत

पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी जाकीर हुसेनला अटक केली. तो नेपाळच्या दिशेने पसार होण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. रक्सौल हे भारत-नेपाळ सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

मुंबईतील नेटवर्कचा शोध

या अटकेनंतर गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. चरसचा मूळ स्रोत कोणता, तो मुंबईपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवण्यात आला, वाहतूक कोण करत होते आणि मुंबईत त्याचे वितरण कोण करणार होते, याचा तपास सुरू आहे. या व्यवहारामागे आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच आरोपींचे मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्यांशी कोणते संबंध आहेत, याचाही तपास केला जात आहे. संपूर्ण पुरवठा आणि वितरण साखळी उघड करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news