रायगड : नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे साडेतीनशे वर्षे जुने झाड जमीनदोस्त (video)

साडेतीनशे वर्ष जुने झाड
साडेतीनशे वर्ष जुने झाड

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कर्मभूमी उमरठ येथील ऐतिहासिक महत्त्‍व असलेले शिवकालीन आंब्याचे झाड मुसळधार पावसामुळे आज ( दि. ११) दुपारी जमीनदोस्त झाले आहे. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रमाणात स्मारकाच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकात एक आंब्याचे झाड साडे तीनशे वर्ष जुने झाड होते. त्याकाळी यवनांच्या कारवाया होत आल्याने आंब्याच्या झाडाच्या ढोलीत मावळे हे हत्यार लपवून ठेवत असत. काही वर्षे पूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या. त्यातील दोन तलवारी येथे असून बाकीच्या तलवारी पुणे येथे नेल्या आहेत. अजून या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत हत्यारे असल्याची माहिती अनेक जाणकार देत होते. मात्र, हे झाड सोमवारी (दि.११) रोजी दुपारच्या सुमारास मुळासकट कोसळले. हे झाड जणू तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगत असल्याचे भासते असल्याचे चर्चिले जायचे.

हे झाड हटविण्याचे काम नरवीर रेस्क्यू टीम तर्फे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते. रामदास कळंबे याच्या उपस्थितीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने सदरचे झाड बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात आला.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news