Murud Janjira Gomukh Tourism: दक्षिण काशी ‘गोमुख’ विकासाच्या प्रतीक्षेत; सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला

दक्षिण काशी ‘गोमुख’ विकासाच्या प्रतीक्षेत; सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला
Murud Janjira Gomukh Tourism
Murud Janjira Gomukh TourismPudhari
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड जंजिरा एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान म्हणजे गोमुख ( गायमुख).येथील परिसर इतका सुंदर आहे कि गोमुख समोर विशाल भव्य लाटा असलेला समुद्र,डाव्या बाजूस अभेद्य जंजिरा किल्ला.उजव्या बाजूस पद्मदुर्ग किल्ला काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वासलेल्ये हे गोमुख पर्यटकांना अतिशय आवडते ठिकाण आहे.

Murud Janjira Gomukh Tourism
Mahad Chabina Festival: वीरेश्वर–रवळनाथ बंधुभेटीचा दिमाख; महाड छबिना उत्सवात नातेकरांची श्रद्धा उसळली

शंकराचे जागरूक स्थान असल्याने महाराष्ट्रातून येथे अस्थी विसर्जनासाठी लोक येतात.सायंकाळी सूर्यास्तावेळी दगडावर बसून ध्यान धारणा करणे अनेक भक्त रोज हजेरी लावतात अशा विशेष पर्यटन स्थळाला विकासासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोरा बंदर रास्ता करून परिसराचे सुशोभीकर करण्यासाठी प्रस्ताव तयार केला.परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही.जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात झाला तर मुरुडला दाखवण्यासारखे 1 पर्यटन स्थळ होईल.मुरुडला येणार प्रत्यक्ष पर्यटक खोरा बंदराला भेट देतो.त्यातूनच तो खोरा बंदरच्या मागिलबाजूस जाऊन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत गायमुखाचे दर्शन करेल आणि मुरुडच्या सुंदर समुद्रकिनारी उतरेल अशी संकल्पना तटकरे साहेबांची होती.ती पूर्ण ह्यावी अशी मुरुडकरांची मागणी आहे.

Murud Janjira Gomukh Tourism
Zolai Mata Mahad Chhabina Festival: 84 गावांची रक्षणकर्ती झोलाईमाता; महाडच्या छबिना उत्सवातील आगमनाचा अद्वितीय थाट

गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागते.सद्य भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते.सुशोभकारांचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊशकतात व या निसर्गातील अजुबाचे दर्शन घेऊन शकतात.

नुकतेच नवीमुबई येथील रंगलर ग्रुप ने फिशिंग रोडने मासेमारीच्या स्पर्धा गायमुख परिसरात घेतल्या शेकडो पर्यटक व मासेमार प्रेमी सहभाग घेऊन पर्यटन चालना दिली.आलेल्या पर्यटकांना किनारा खूप आवडला हा परिसर विकास करण्याची मागणी कीन लागलेत.

Murud Janjira Gomukh Tourism
Mahad Veereshwar Maharaj Chhabina Festival: महाडचे आराध्यदैवत श्रीगावदेव वीरेश्वर महाराज

गायमुखावर निसर्गाचा खराखुरा आनंद घेण्यासाठी आमच्या घरातील आजोबांपासून ते मी त्यांची नातं आजही जाते.सायंकाळी लालसर सूर्यप्रकाशात समुदाच्या लाटांना जोर असतो त्यावेळी समुद्राचे पाणी देखील सोनेरी होता मी पहिले आहे.इतके सुंदर पर्यटन स्थळ विकास का होत नाही ? मी सांगीन पहिला अधिकृत रस्ता करण्यात यावा.जेष्ठ नागरिकांना जाताना खूप त्रास होतो.

अर्चना नवले, पर्यटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news