

सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: मुरुड शहरात सद्या सकाळी 36 पारा से.सि. असतो. सकाळपासून गरम वातावरण असल्याने समुद्राच्या गार पाण्यात कुल-कुल होण्यासाठी पर्यटक मुरुडला उन्हाळी सुटी मुरुडला एन्जॉय करण्यासाठी आलेत.गेली 2 दिवस अतिशय गरम असल्याने पर्यटक वातानुकूलित रूममधून बाहेर पडत नाहीत सायंकाळी सूर्यास्तावेळी मुरुड किनारी फिरण्याचा आनंद घेत आहेत.
राज्यात सर्वत्र परीक्षेचा हंगाम संपल्याने कोकणातील समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकांनी धाव घेतली आहे, पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी राहणार आहे. सुटी लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात सायंकाळी अल्हाददायक व सुंदर वातावरण आहे.
समुद्र हळू-हळू उसळू लागला असल्याने मासेमारी धोक्यात आहे, माशांची अवाक घातल्याने पर्यटकांना महाग मासे घ्यावे लागत आहेत.मुरुडला आलात आणि मासे खाल्ले नाही तर मन राहत नाही महाग असलेतरी मासे खाणार अशी पर्यटकांची धारणा असते.
पर्यटक मुरुड समुद्रकिनारी असलेली वातानुकूलित हॉटेलला पहिली पसंती देत आहे.मुरुडचा पारा 38 वर गेल्याने मुंबई-पुणे येथील पर्यटक लहानमुलांसाठी वातानुकूलित हॉटेल बुक करत आहेत.मासळी कमी असल्याने पर्यटक किनाऱ्यावरील,नवनवीन चविष्ट पदार्थांच्या स्टॉलवर पाणीपुरी,भेळ पुरी अशा विविध पदार्थंची चव घेत आहेत.
नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्राम धाम हि बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ येणाऱ्या पर्यटकांना होणार.पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छ करतात,मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत.
मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण,कुडे मांदाड लेणी,खोकरी,दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल करण्यात आलेत सलग सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सांगणे आहे कि सकाळी 9 ते 11 पर्यंत किल्ल्यात जाऊन या व जाताना नाश्ता व भरपूर पाणी प्या अतिशय गरम्यामुळे हि काळजी घेणे गरजेचे आहे.जंजिरा किल्ल्यात फिरताना किल्ल्यात सावलीची ठिकाणे कमी असल्याने पर्यटकांनी उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्या.
दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मी माझ्या कुटुंबासमवेत मुरुडला येतोच.समुद्र किनारी हॉटेलवर राहतो पण यावर्षी अतिशय गरमी असल्याने समुद्रावर सकाळीच जावे लागते.दुपारी कडक उन्हाचा त्रास होतो आणि समुद्रकिनारी वातानुकूलित हॉटेल कमी असल्याने बुकिंग न करता आलेल्या पर्यटकांचे हाल होत आहेत.
- विजय जानकर, पर्यटक
उन्हाळी सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांनी पुढील काहीदिवस कडक उन्हाची लाट येणार असल्याने उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी भरपूर पाणी प्या,सावलीसाठी छत्रीचा वापर करा, पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटीचे भान ठेऊन समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घ्या.
- सचिन बच्छाव, मुख्याधकारी, मुरुड नगरपालिका