Murder | घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीची पत्नीकडून सिनेस्टाईल हत्या

Raigad Crime News | Woman Kills Husband After He Refuses Divorce | पत्नी, मुलासह मदत करणाऱ्या दोघांना अटक
 Murder
घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या file photo
Published on
Updated on

उरण (जि. रायगड) : घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीचा मुलाच्या आणि मित्रांच्या सहाय्याने काटा काढण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी उलवे पोलिसांनी पत्नी मुलासह अन्य दोघा जणांना अटक केली आहे. उलवे पोलिसांना नवी मुंबई विमानतळ सर्विस रोड वरून वहाळ गावकडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह २३ फेब्रुवारीला सापडला होता. उलवे पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू अशी नोंद घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू केली होती. त्याच दरम्यान रेश्मा सचिन मोरे व तिचा मुलगा हे दोघे तिचा पती सचिन मोरे हा बेपत्ता असल्या बाबतची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यास आले होते. त्यावेळी तिला अनोळखी मयत इसमाचे फोटो दाखविल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले.

सदर महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता ती चौकशीमध्ये असमाधानकारक व संदिग्ध उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला. तिच्या मोबाईल त्यांच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवाल यावरून सदरच्या मृत इसमाचे नाक व तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने २६ रोजी खुनाचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर पुढील तपास केला असता रेश्मा मोरे यांनी त्यांचा पती मृत सचिन मोरे यांच्याकडून मानसिक व शारीरीक त्रास देत असल्याने त्यास घटस्फोट देण्यास सांगितले होते. परंतु पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने त्यांनी पतीस जिवे ठार मारण्याचे ठरविले.

रेश्माने मुलासह तिचा मित्र रोहित टेमकर व रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने कट रचून रोहित टेमकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या नशेच्या गोळया सचिन मोरे यास जास्त प्रमाणात कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून प्यायला दिला. सचिन मोरे नशेच्या गुंगीमध्ये असताना त्यास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रे याचे रिक्षामध्ये पत्नी, मुलगा व मृत असे रिक्षात बसून शगुन चौक, उलवे, डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ, कळंबोली, एमजीएम हॉस्पिटल कामोठे, उरण, जेएनपीटी परिसर इत्यादी भागात फिरवून जासई येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षा थांबविली. त्यावेळी पत्नी रेश्मा मोरे हिने सचिन मोरे याचा ओढणीने गळा आवळून खून केला व त्यास तसेच पुढे एखाद्या वाहनाखाली खाली फेकून देऊन अपघात झाल्याचे दाखवावे असे उद्देशाने पुढे रिक्षा चालवत घेऊन जात असताना त्यास रिक्षामधुन बाहेर फेकणे शक्य नव्हते. त्यात त्याचा परत श्वास सुरू असल्याचे रेश्मा यांच्या लक्षात आल्याने तिने परत त्याचे नाक व तोंड हाताने दाबून ठार मारले व वहाळ खाडीवरील ब्रिजवर मुलगा व रिक्षा चालक याच्या मदतीने सचिन मोरे यास फेकून दिल्याचे चौकशीत उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news