

महाड ः मुंबई ते रामदास पठार एसटी बसला वरंध जवळ अपघात झाला. या एसटीमधून 20 शालेय विद्यार्थ्यांसह 13 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 30 प्रवासी जखमी झाले असून त्यांना वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-रामदास पठार ही बस वरंध गावा जवळ आली असता एसटी बस स्टेअरिंग जाम झाल्याने व ब्रेक कमी लागत असल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या बाजूला असणार्या साईड पट्टीवर नेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या अपघातात जखमी झालेल्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना उपचारासाठी वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले महाड आग्रहातील अनेक एसटी बसेस कालबाह्य व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार बंद पडत असताना देखील अशा एसटी बसेस ग्रामीण भागातील दुर्गम खेडोपाडी व घाट रस्त्यावर पाठवण्याच्या प्रकारामुळे वारंवार अपघात घडण्याची मालिका वारंवार घडत असताना देखील याकडे एसटी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आजचा अपघात हे त्याचेच जिवंत उदाहरण असून असून केवळ एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे आजचा अपघात होता होता टळला अशा प्रतिक्रिया गाडीतील प्रवाशांनी व्यक्त केल्या.