Missing Link Highway Project
खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतुक कोंडी आणि अपघात होतात. तसेच, पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊन एक-सप्रेस वेवर मिसिंग लिंक ही नवीमार्गिका होत आहे. ही मार्गीका ऑगस्ट २०२५ अखेर खुली करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार सर्व कामे पूर्ण होऊन डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत मिसिंग लिंक मार्गिका खुली केली जाण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसीची प्रकल्प आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक, पुणे रिंग या कामांचा आढावा घेत काही सूचना केल्या आहेत.
एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिकच्या कामातील व्हर्टिकल ब्रीजचे काम सध्या वेगात सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.