Raigad Bus Fire : बोरघाटात खाजगी मिनी बस जळून खाक

१५ प्रवासी बचावले, इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागली आग
Raigad Bus Fire
Raigad Bus Fire pudhari photo
Published on: 
Updated on: 

खोपोली : प्रशांत गोपाळे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ एका खाजगी मिनी बसला २५ नोव्हेंबर रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील १५ प्रवाशांचे प्राण वाचले असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून १५ प्रवाशांना घेऊन ही मिनी बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकमार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, बोरघाटातील खोपोली बायपासजवळ आल्यानंतर बसच्या इंजिनच्या भागातून अचानक धूर येऊ लागला.

Raigad Bus Fire
Mira Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेत शाकाहार, मांसाहाराचा दुजाभाव

त्यानंतर शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतला. तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसचालक योगेश याने प्रसंगावधान राखत तातडीने बस महामार्गाच्या साईडपट्टीवर घेतली. त्यानंतर बसमधील सर्व १५ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. तसेच या घटनेची माहिती तात्काळ बोरघाट पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी कंट्रोलचे फायर रेस्क्यू पथक तसेच खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मिनी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दरम्यान, बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून पर्यायी खासगी बसची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे १५ प्रवाशांचे प्राण वाचले. तर मोठी दुर्घटना टळल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Raigad Bus Fire
Thane BMC Bomb Threat : ठाणे पालिका मुख्यालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.