Ro-Ro ferry service raigad news | पावसाळ्यातही मुंबई-मांडवा रो-रो सेवा सुरळीत राहणार

गाळ काढल्याने सुरक्षित वाहतूक सेवा
Ro-Ro service raigad
Ro-Ro service raigad
Published on
Updated on

अलिबाग : पावसाळ्यातही जलवाहतूक सुरळीत सुरू रहावी अर्थात मुंबई ते मांडवा रो रो सेवा यासाठी येथील गाळ उपसा काढण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. साधारणपणे ६६ हजार क्युबीक मीटर गाळ काढला जाणार आहे. साधारणपणे 1 कोटी 60 लाखाची निविदा मंजूर केली आहे. गाळसंचयामुळे प्रवासी जलवाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. मुंबई-मांडवा दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. गाळ सातत्याने काढत राहिल्यास बोटींना त्रास होणार नाही.

सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बंदरात गाळामुळे खोल पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. मागील दोन वर्षापासून या बंदरातील गाळ काढला नसल्याने जहाजांची सुरक्षित ने-आण धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जलवाहतूक अखंडित ठेवण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून तातडीने गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Ro-Ro service raigad
Gateway Mandwa ferry service Close: मांडवा ते गेटवे जलवाहतूक 26 मेपासून राहणार बंद; पावसाळ्यात सुरक्षेसाठी उपाययोजना

ब्रेक वॉटर बंधाऱ्यालगत गाळ सर्वाधिक साचत असल्याने त्या भागात मोठ्या क्षमतेची ड्रेजिंग यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरळीत सेवा देण्यासाठी शक्य तितका गाळ बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी गाळ काढण्याची प्रक्रिया करावी लागत आहे. आतापर्यंत या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा गाळ साचू लागतो. यामुळे महागड्या ड्रेजिंग कामांचा आर्थिक बोजा वाढत असून, कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज निर्माण झाली आहे. मांडवा येथे प्रवासी वाहतुकीसोबतच रो-रो सेवेचा विस्तारही अपेक्षित आहे. मात्र सततच्या गाळसंचयामुळे मोठ्या जहाजांना जागा उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत.

Ro-Ro service raigad
PMPML Bus Breakdown: पीएमपी बसांचा प्रवास पुन्हा विस्कळीत; दररोज 50 हून अधिक बस बंद

मांडवा बंदरातील गाळ काढण्यास आणि रो-रो वाहतुकीसाठी लागणाऱ्या सर्व कामांसाठी आतापर्यंत सुमारे २०० कोटी खर्च झाले आहेत. रो-रो सेवेला जेमतेम पाच वर्ष पुर्ण झाल्यानंतर चालु आर्थिक वर्षात गाळ काढणे आणि डागडुजीच्या कामासाठी एप्रिल महिन्यात १ कोटी ६० लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. यातून हे गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले येत्या आठवड्यात संपेल अशी माहिती मेरीटाईम बोर्डाकडून देण्यात आली.

Ro-Ro service raigad
Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला गती; 31 मेपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता

२६ मे पासून सागरी जलवाहतुक मांडवा ते गेट वे मान्सूनमुळे बंद राहणार आहे, मात्र त्याचवेळेस रो-रो सेवा नियमित सुरु राहणार आहे. मांडवा ते मुंबई (भाऊचा धक्का ) जलप्रवासासाठी ही एकमेव सेवा असल्याने ती पावसाळ्यात गाळ काढल्याने नियमितपणे सुरु राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news