

खांब : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सगळीकडे पडत आहे. त्यातच मुंबई गोवा महामार्ग लगत सुकेळी खिंड आणि मोठा डोंगर घाट मा-थ्यावर सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी वाढली असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
वाहणारे नाले ही तुडुंब भरले असल्याने सारे पाणी हे मेन महामा-र्गावर आल्याने नागोठणे कोलाड मार्गावरील सुकेळी व महाराष्ट्र सिमलेस जिंदाल कंपनी जवळ मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनातूक निर्माण झाली तर पहाटे चार वाजल्यापासून ही वाहनातूक कोंडी झाल्याचे समजते तर वाहतूक कोंडीवर नियंत्रण करण्यासाठी तसेच पर्जन्यवृष्टी पूरप-रिस्थितीत वाहने कोणी हाकू नये त्याच बरोबर कॉडी नियंत्रित करण्यासाठी नागोठणे आणि कोलाड पोलिस यंत्रणा यासाठी कार्यरत झाली असून त्यांची देखील मोठी दमछाक होत असल्याचे दिसून येत होते.
अखेर पोलिसांनी यावर मार्ग काढत सिमलेस आणि जिंदाल या कंपनीच्या आतून वाहने काढून वाहतूक कोंडी सोडवत आहेत. तर महाराष्ट्र सिमलेस जिंदाल कंपनी यांनी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यावर भली मोठी जाळी लावली असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर मार्गावर पाणी साचत आहे तर या पाण्यामुळे जवळपास पहाटे चार वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प झाली असून प्रवासी देखील खोळंबले असल्याचे सुकेळी गावातील नागरिक सतीश सुटे यांनी सांगितले. तर या सततच्या पावसाचा परिणाम मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतु-कीवर दिसून येत आहे.
मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि डोंगर भागातील पाणी हा खालील कळवा आणि आंबा नदीच्या पातळीत जातो मात्र गेली चार दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसाने मोठी अतिवृष्टी निर्माण झाल्याने या मार्गावर पाणी साचून राहिले असल्याचे दिसून येत आहे. तर सुकेळी परिसरात कारखानदारी वाढत आहे त्याचे भराव आणि पाणी वाहून जाणारा नाला यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे ही परिस्थिती ऊद्दधली असल्याचे बोलले जात आहे. तर सुकेळी गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठा फटका वाहतुकीवर झाला आणि किमान पाच ते सहा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. निर्माण झालेल्या वाहतूक कोंडी सोडविण्यास नागोठणे आणि कोलाड पोलिस कमालीचे हैराण झाले होते मात्र भर पावसात देखील सावधगिरी बाळगून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना दिसून येत होते.
कारखानदारीच्या भरावाचा परिणाम
सुकेळी परिसरात कारखानदारी वाढत आहे त्याचे भराव आणि पाणी वाहून जाणारा नाला यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे तर सुकेळी गावाजवळ मुंबई गोवा महामा-र्गावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठा फटका वाहतुकीवर झाला आणि किमान पाच ते सहा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली.