Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
 Mumbai-Goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक बंदीRepresintive Imges
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये, याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिले.

मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १० वर्षांपासून सुरु

मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. ४७१ कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरू करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यातील अनेक ठिकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करावा, असेनिवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिले. त्यावर गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

मुंबई-गोवा मार्गावर बांधण्यात येणाऱ्या ट्रॉमा हॉस्पिटलचे काम लवकर सुरू करून ते पूर्ण करावे, अशी विनंतीही वायकर यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे यावेळी केली. मुंबई-गोवा राज्यमार्गावरील भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परशुराम घाट येथे भूस्खलन होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, असेही वायकर यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news