

श्रीकृष्ण द बाळ
महाड: राष्ट्रीय महामार्ग विभाग व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बंगलापर्यंतच्या असलेल्या 11 ब्लॅक स्पॉटचा हडसर दूर करण्यात यश आले आहे. या संदर्भातील माहिती महामार्ग पोलीस ते महाड विभागाचे उपनिरीक्षक श्री रामचंद्र ढाकणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
मागील 2 ते 3 दशकांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते कशेडी बंगला या मार्गावर झालेल्या विविध अपघातामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात्रा ब्लॅक स्पॉटमध्ये इंदापूरपासून या केंद्रांचा समावेश होता.
महामार्गावर तत्कालीन काळात झालेल्या या अपघातांच्या केलेल्या दोन्ही विभागांकडून तपासांती 11 ब्लॅक स्पॉट निदर्शनास आले होते. यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी संबंधित सर्व ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना तसेच प्रवासी वर्गाला सावधानतेचा इशारा देणारे फरक तसेच स्पीड ब्रेकर अत्यावश्यक ठिकाणी बसवून या अपघातांचा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मागील पाच वर्षापासून सुरू असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यादरम्यान या दोन विभागांकडून करण्यात आलेल्या योजनांना अंतिम रूप प्राप्त झाल्याने या सर्व ठिकाणी होणाऱ्या अपघात आता कायमस्वरूपी दूर करण्यात यश आल्याची माहिती उपनिरीक्षक श्री ढाकणे यांनी दिली. यामधील प्रमुख या ठिकाणी झालेल्या अपघातांची मागील तीन दशकातील संख्या मोठी होती महामार्गाच्या झालेल्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामाने या अडचणी आता कायमस्वरूपी दूर करण्यात आल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर महाड उपविभागामध्ये महाड शहराच्या पश्चिमेकडे गांधार पाले नजीक असलेल्या महामार्ग पोलीस ठाण्याचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती ढाकणे यांनी दिली. ही संबंधित जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने या ठिकाणीच सार्वजनिक सोयी संदर्भात योजना प्रस्तावित असून त्याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना स्वतंत्रपणे इमारत बांधून देण्याबाबतच्या प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या ब्लॅक स्पॉटला मागील काही वर्षात दोन्ही विभागांकडून स्पष्टपणे निर्देशित करण्यात आले होते. दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे हा धोका आता कायमस्वरूपी दूर झाल्या असल्याकारणाने वाहतूक यंत्रणा तसेच प्रवासी वर्गातून दोन्ही विभागांना धन्यवाद देण्यात येत आहेत.