Ganpati Temple: उलवे नोडमधील मुरबा गणपती मंदिर भक्तांचे होतेय श्रद्धास्थान; भर समुद्रात बोटीतून करावा लागतोय प्रवास

संकष्टीला हजारो भाविकांनी घेतले दर्शन
Morave Murba Ganpati temple
Morave Murba Ganpati templePudhari
Published on
Updated on

विठ्ठल ममताबादे

जेएनपीए: पनवेल तालुक्यातील उलवे नोड मधील समुद्र किनारी वसलेले मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे.

मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत.भक्तांच्या सेवेसाठी आता यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दोन पॅसेंजर बोटी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.यामुळे भक्तगणांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Morave Murba Ganpati temple
Kalamboli Spa Racket: स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कळंबोलीत छापा; दाम्पत्याला अटक

मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे महेंद्र घरत यांनी गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट देण्याचे जाहीर केले.त्यानुसार गेल्या वर्षी 29 मे 2025 रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी उपलब्ध करुन देण्यातआले. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला.

तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली.

तिचे लोकार्पण महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील,ॲडय अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित बोते.

भर समुद्रात सुंदर मंदिर

पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे. गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे.

Morave Murba Ganpati temple
Child Labour Rescue: वेठबिगारीच्या जोखडातून झाली मुक्तता; म्हसळ्यातील चार मुले घरी परतली

मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.

- महेंद्रशेठ घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news