Kalamboli Spa Racket: स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कळंबोलीत छापा; दाम्पत्याला अटक

पीडित महिलेची सुटका
Kalamboli Spa Racket
Kalamboli Spa RacketPudhari
Published on
Updated on

पनवेल: बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या कळंबोलीतील एका स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून पती-पत्नीला अटक केली आहे. तसेच एका पीडित महिलेची येथून सुटका केली आहे.

कळंबोली, सेक्टर-16 मधील निलकंठ धाम इमारतीतील गोल्डन किंग सलून आणि स्पा येथे मसाज पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोल्डन किंग सलून आणि स्पामध्य बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला.

Kalamboli Spa Racket
Child Labour Rescue: वेठबिगारीच्या जोखडातून झाली मुक्तता; म्हसळ्यातील चार मुले घरी परतली

या कारवाई पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून स्वीकारलेल्या 500 रुपयांच्या नोटा, तीन महागडे मोबाईल जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत समीर ऊर्फ अलीगोर अब्दुलहफिज अन्सारी (33) व त्याची पत्नी परी ऊर्फ सलमा अलीगोर अन्सारी (वय 26) हे पती-पत्नी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तसेच त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने समीर परी या दोघांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news