Mora jetty repair issue: मोरा जेट्टीची प्रचंड दुरवस्था; दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांच्या अडचणीत भर

दुरुस्तीसाठी जेटीवरील लाद्या काढण्यात आल्या आहेत.
Mora Jetty
Mora JettyPudhari
Published on
Updated on

उरण : उरण ते भाऊचा धक्का या महत्त्वाच्या जलप्रवासी मार्गावरील मोरा जेटीची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून जेटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुरुस्तीसाठी जेटीवरील लाद्या काढण्यात आल्या आहेत.

Mora Jetty
Traffic Congestion: दिघा गाव रेल्वे स्थानकासमोरील चौकात वाहतूक कोंडी

मात्र त्या जेटीच्या बाजूलाच साठवून ठेवल्यामुळे चालण्याचा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.या अरुंद मार्गावरच मच्छिमारांनी आपली जाळी पसरवून ठेवल्याने प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Mora Jetty
RTE Admission: आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 8 मेपर्यंत अंतिम संधी

अनेकदा या जाळ्यांत पाय अडकून प्रवाशांचे अपघातही घडत आहेत. जेटीवरील पेव्हर ब्लॉक उखडल्याने रस्ता खड्डेमय झाला असून, सुरक्षेसाठी असलेले कठडेही अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यातच जेटीवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. एकीकडे तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news