Raigad News : बेकायदा दगड खाणींच्या अवजड वाहनावर अल्‍पवयीन चालक

दूरशेतच्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ, सतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको
Raigad News
Raigad News : बेकायदा दगड खाणींच्या अवजड वाहनावर अल्‍पवयीन चालकFile Photo
Published on
Updated on

Minor driver driving heavy vehicle for illegal stone quarrying

रायगड : पुढारी वृत्त्तसेवा

पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरात अनेक बेकायदेशीर दगडखाणी आणि क्रशर प्लांट आहेत. यामधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांच्या माध्यमातून दुरशेत रस्त्यावर माल वाहतूक होते. यामुळे मुंबई गोवा महामार्ग ते दुरशेत रस्त्याला मोठंमोठाले खड्डे पडून अनेक अपघात झाले आहेत.

Raigad News
Matheran Trekking : माथेरानमध्ये ट्रेकिंग ठरतेय धोक्‍याचे, अपुर्‍या माहितीच्या आधारे ट्रेकर्स चुकतात पायवाट,मग लागते वाट

असे असतानाही तहसीलदार पेण महसूल आणि पेण परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुरशेत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणार्‍या दगडखाण आणि क्रशर्स माफीयांना अभय देत असल्याचा आरोप दुरशेत ग्रामस्थ करित असतानाच, शनिवारी मालवाहू अवजड डंपरवर 16 वर्षीय अल्पवयीन चाकल वापरा जात असल्याचे समोर येताच, ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपेणे रास्तारोको आंदोलन केले.

उपविभागीय अधिकारी पेण,तहसीलदार पेण यांच्यासह पेण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना पत्राद्वारे तक्रारी करूनही आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने दुरशेत ग्रामस्थांमध्ये आधीच संतापाची लाट असताना शनिवारी (31 मे रोजी) ओव्हरलोडेड अवजड वाहनांमधून मालवाहतूक करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन चालकाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दुरशेत ग्रामस्थांनी संबंधित वाहन थांबवून जोपर्यंत वाहनाचे मालक येत नाहीत तोपर्यंत वाहन न सोडण्याचा निर्णय घेत रस्ता रोको केल्यानंतर पेणचे भाजपा नेते वैकुंठ पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून फोन करून दुरशेत रस्ता मी स्वखर्चाने बांधला आहे असे सांगत वाहने अडवू नयेत असे सांगीतले. मात्र संतप्त दुरशेतकरांनी जोपर्यंत अल्पवयीन वाहन चालकाच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वाहने न सोडवण्याचा निर्णय घेत अजून संताप व्यक्त केला.

Raigad News
Raigad MSEB News म्‍हसळ्यात महावितरणचा लपंडाव!

शनिवार दुरशेत रस्त्यावरून खडीने भरलेला ओव्हरलोडेड डंपर वाहन क्रमांक चक 06 उझ 1754 चालक विजेंद्र कुमार साकेत भरधाव वेगाने धूळ उडवत जात असताना दुरशेत गावातील तरुणांनी त्या डंपरला अडवले असता सदर डंपरमधील चालक हा फक्त 16 वर्षीय अल्पवयीन असल्याचे समजले. म्हणून आधीच संतप्त असलेल्या दुरशेत ग्रामस्थांनी दुरशेत रस्त्यावर अवजड वाहनांसाठी रास्ता रोको केला. रास्ता रोको केल्यानंतर वैकुंठ पाटील यांनी त्यांच्या कामगारांच्या मोबाईल वरून ग्रामस्थांसोबत संपर्क साधला, त्याचवेळी दुरशेत रस्ता मी स्व खर्चाने बनवला आहे, तुम्ही गाड्या अडवू नका असे सांगितले. दुरशेत रस्ता हा आमच्या हक्काचा आहे त्यावर पहिला अधिकार आमचा आहे असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. रस्ता तुम्ही बनवला असला तरी त्यावरून अल्पवयीन चालकांनी वाहने चालवायची का असा प्रतिप्रश्नही केला. पोलिसांनी ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन बंद करण्यास सांगितले परंतु ग्रामस्थांनी त्यासही नकार दिला.

वाहनमालक सावनी इन्फ्रा आणि वाहनचालक विजेंद्र कुमार साकेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली,पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news