Raigad news: चॅटिंग करताना आईने पाहिले म्हणून मुलीने सांपवले आयुष्य

संबंधित मुलगी ही मराठी माध्यमिक शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती.
Raigad news
Raigad newsPudhari
Published on
Updated on

म्हसळाः म्हसळा तालुक्यात एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (4 एप्रिल) मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चॅटिंग करताना आईने पाहिले म्हणून मुलीची आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

संबंधित मुलगी ही मराठी माध्यमिक शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. तिची मोबाईलद्वारे दोन अनोळखी मुलांशी ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी ती त्या मुलांशी बोलत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले.

Raigad news
Crime News: नवी मुंबईचा उडता पंजाब! ड्रग्ज तस्करीत आतापर्यंत 38 जण अटकेत

यावरून आई रागावेल किंवा मारेल या भीतीपोटी मुलीने राहत्या घरातील खोलीत साडीच्या झोक्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे उपचारासाठी दाखल केले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Raigad news
Water Issue: जोगेश्वरीच्या मेघवाडीत नळाला काळे पाणी; पाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news