Political News: 'मला फसवलेत पण एकनाथ शिंदे साहेबांना फसवू नका...'

म्हसळा नगरपंचायत शिवसेनेच्या नगरसेवकांना खासदार सुनिल तटकरे यांचा सल्ला
Political News
Political NewsPudhari
Published on
Updated on

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा - म्हसळा नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ७ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. नंतर बऱ्याच राजकीय व कायदेशीर घडामोडी घडल्या आणि त्या नगर सेवकांना अपात्र ठरविण्यात आले. दि.२५ एप्रिल रोजी त्या अपात्र नगरसेवकांनी सुतारवाडी येथे माझी भेट घेऊन आम्हाला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घ्या.. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास तयार आहोत अशी विनंती केली होती परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही मला फसवलेत पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फसवू नका.

मी युती धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही तिकडेच खुश रहा असे मी त्या नगरसेवकांना सांगितले आहे असा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

Political News
Raigad Investment Projects: रायगडमध्ये लवकरच एक लाख कोटींची गुंतवणूक; खासदार सुनील तटकरे यांची माहिती

म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पक्षांतर केलेल्या सात सदस्यांच्या अनर्हता प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अनर्हतेच्या आदेशास तात्पुरती स्थगिती दिली असली तरी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या सदस्यांवर पुन्हा एकदा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे.

अनर्हता ठरलेले नगरसेवक सध्या शिवसेनेत गेले असले तरी ते अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याने नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करणे त्यांना बंधनकारक राहील. पक्षाचा व्हीप म्हणजेच पक्षादेश बजावण्यात आले असून त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

यावेळी त्यांनी पक्षांतर केलेल्या सदस्यांवर टीकास्त्र सोडले. “म्हसळा नगराचा भरघोस विकास सुरू असताना ज्यांनी आम्हाला फसवले, त्यांनी निदान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना फसवू नये,” असा टोला त्यांनी लगावला.

तसेच पक्षांतर केलेले काही नगरसेवक नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी माझ्याकडे आले होते. आम्हाला पुन्हा पक्षात घ्या अशी विनंती त्यांनी केली होती.मात्र त्यांना मी स्पष्ट नकार दिला असेही खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Political News
Mumbai Pune missing link: विकासाच्या ‌‘कनेक्टिंग लिंक‌’ मधून कोकण गायब; मिसिंग लिंक सुसाट, मुंबई - गोवा महामार्ग जाम

यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिप सदस्य अनिल बसवत, प्र.नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, पं.स.सदस्य लहू म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, नगरसेवक सुनिल शेडगे, नगरसेविका सरोज म्हशिलकर, सोनल घोले, संतोष सावंत, महेश घोले, किरण पालांडे उपस्थित होते.

दरम्यान,दिनांक ७ मे २०२६ रोजी होणाऱ्या म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पुन्हा कारवाई करण्यात येईल असा पुनरुच्चार खासदार सुनिल तटकरे यांनी केला. त्यामुळे म्हसळा नगरपंचायत राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अपात्र प्रकरणी तात्पूर्ती स्थगिती दिलेली असल्याने ७ मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक कोणाला मतदान करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news