रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी

रायगड : महाडमधील गादी कारखान्याला भीषण आग; शेजारचे एक दुकान भस्मस्थानी

महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड शहरातील संत रोहिदास नगर परिसरात असणाऱ्या गादी कारखान्याला आज (दि.२६) रात्री आठच्या सुमारास आग लागली. शेजारील प्लॅस्टिक मॉललाही या आगेचा मोठा फटका बसला असून मोठे नुकसान झाले आहे. बघता बघता या आगेने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांध्ये घबराहट पसरली.

या आगेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेचा अग्निशामन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. व  त्यानंतर या आगेवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. या घटनेमुळे अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news