Matheran Toy Train: नेरळ-माथेरान मिनीट्रेन आजपासून सुट्टीवर

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय, पर्यटकांना ‘टॉय ट्रेन’चा प्रवास बंद
Matheran Toy Train
Matheran Toy TrainPudhari
Published on
Updated on

नेरळ: पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेली नेरळ - माथेरान मिनी ट्रेन (टॉय ट्रेन) सोमवारपासून (१५ जून) पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात येत आहे.

माथेरान हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून मिनी ट्रेन हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. डोंगररांगा, दऱ्या आणि निसर्गरम्य परिसरातून धावणाऱ्या या ऐतिहासिक रेल्वेचा अनुभव घेण्यासाठी वर्षभर हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात.

Matheran Toy Train
Mumbai Pune High Speed Rail: मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटात; देशात ७ प्रमुख हाय-स्पीड रेल कॉरिडोर

मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका, रेल्वे मार्गावर झाडे पडणे तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही सेवा काही महिन्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंद ठेवली जाते.

मागच्या वर्षी मे महिन्यामध्येच मान्सुनला सुरवात झाल्याने ही ट्रेन मे महिन्यात बंद करण्यात आली होती. मात्र यंदाचा मानसूनला झालेला विलंब व मिनी ट्रेनकरीता अडथळा न येणारे वातावरण पाहाता यंदा जून महिन्यापर्यंत पर्यटकांना या मिनी ट्रेनचा आनंद घेता आला आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे मार्गाची तपासणी, दुरुस्ती आणि आवश्यक देखभाल केली जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाल्यावर प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा लाभ मिळतो. मिनी ट्रेन सेवा बंद राहणार असली तरी पर्यटकांना माथेरानला जाण्यासाठी नेरळ-माथेरान रस्तामार्ग तसेच अमन लॉजपर्यंत उपलब्ध असलेल्या पर्यायी वाहतूक सुविधांचा वापर करता येणार आहे.

Matheran Toy Train
Alibag Woman Harassment Case: शारीरिक संबंधास नकार दिल्याचा राग; विवाहितेवर घरात घुसून जीवघेणा हल्ला

अखेरचा दिवस मिनीट्रेन हाऊसफुल्ल

पावसाळ्यापूर्वीच्या अखेरच्या दिवशी अनेक पर्यटक आणि रेल्वेप्रेमींनी मिनी ट्रेनचा आनंद घेत या ऐतिहासिक रेल्वे सेवेला तात्पुरता निरोप दिला. आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा ही मिनी ट्रेन माथेरानच्या घाटातून शिट्टी वाजवत धावणार आहे.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा

पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अमन लॉज ते माथेरान आणि माथेरान ते अमन लॉजदरम्यान शटल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. या सेवेमुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पावसाळ्यातील धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईने नटलेले निसर्गरम्य वातावरण आणि विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेता येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शटल सेवा नियमितपणे धावणार असून पर्यटकांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news