Matheran | धुक्यात हरवले माथेरान शहर, पावसाळी पर्यटनासाठी पसंती

सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श पर्यटन स्थळ ट्रेकिंगसाठी पसंती
Matheran
धुक्यात हरवले माथेरान शहर, पावसाळी पर्यटनासाठी पसंतीpudhari photo
Published on
Updated on
माथेरान : मिलिंद कदम

माथेरानला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून पावसाळ्यात चार महिने संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात व डोंगर कुशीत धुक्याची चादर पसरलेली असते त्यामुळे येथील निसर्गाची शोभा पर्यटकांना भुरळ टाकल्याशिवाय राहत नाही. जून महिन्यात पावसाची चाहूल लागताच पिकनिकच्या योजना आखल्या जातात. विशेष ट्रेकिंगसाठी माथेरानला पसंती दिली जाते. अशा लोकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून मागील काही वर्षांमध्ये प्रसिद्धीस आलेले आहे.

अगदी मुंबई-पुणेपासून जवळ असलेले तसेच माथेरानच्या डोंगर कुशीत आजूबाजूला वसलेली शहरे यांना जवळचे ठिकाण म्हणजे रायगडची शान माथेरान. पावसाळी आनंद तर काही वेगळाच असतो तीन महिने तर येथील झाडावरून धुक्याची चादर निसर्गाने पसरलेली असते, त्यामुळे पर्यटकही आनंदात असतात. समुद्रसपाटीपासून माथेरानची उंची 2656 फूट असल्याने साहजिकच खोलवर दर्‍या, कपार्‍या आहेत. पॉईंट वरून दूरवर पाहिले की नदी नाले, डोंगर, दर्‍या दिसत असून फेसाळ वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असतात.

Matheran
Matheran | इ- रिक्षामुळे माथेरानला वाढले पर्यटन

अगदी माथेरानच्या पूर्वेस नजर टाकली की नेरळ हे मध्य रेल्वेचे रेल्वे स्टेशन दिसते त्या ठिकाणी उतरल्यावर लगेच माथेरानचे दर्शन घडते तेथून पर्यायी व्यवस्था म्हणजे नेरळ माथेरान टॅक्सी सर्विस तसेच कर्जत ते माथेरान दरम्यान वेळेनुसार मिनी बस सेवा आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यातून डोंगराच्या वळणदार घाट रस्त्यातून काही कंपनीचे ग्रुप चेकिंग करत पायी येत असतात. मधेच वॉटर पाईप स्टेशन जवळ मोठा धबधबा असल्याने त्याची मजा घेत दस्तुरी या प्रवेशद्वाराजवळून माथेरानला येता येते. माथेरानला आल्यावर महत्त्वाच्या पॉईंटची सहल पर्यटकांसाठी पर्वणीच असून वेगवेगळ्या पॉईंटवरून नयनरम्य दृश्य न्याहाळता येतात. पायी भ्रमंती करताना अडचणीचे मार्ग टाळावेत. येथील वनसंपदा व जुलै महिन्यापासून वाहणारा शारलोट लेकचा ओसांडून वाहणारा धबधबा पर्यटकांना ओलाचिंब करण्यासाठी मोहित करीत असतो. एक दिवसाच्या सुट्टीत पर्यटक या लेकच्या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.

शनिवारी रविवारी पर्यटकांची जत्रा

शनिवारी रविवारी इको पॉईंट खंडाळा, पॉईंट बिग, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट या ठिकाणी तर पर्यटकांची जत्रा भरलेली असते. माथेरानचा टेबल लँड समजल्या जाणार्‍या लुईझा पॉईंटवरून रसायनी, पनवेल, मोरबे धरण स्पष्टपणे न्याहाळता येते.

ट्रेकिंगसाठी माथेरान सुरक्षित

ट्रेकिंगसाठी माथेरान हे सुरक्षित ठिकाण असून माथेरानच्या चारही बाजूंनी ट्रेकिं साठी मार्ग आहेत. त्यातील चौक मार्गे वन ट्री हिल पॉईंट हा सर्वात सुरक्षित व ट्रॅकर लोकांच्या आवडीचा रस्ता आहे. तसेच पनवेल मार्गे धोदाणी मार्गे सनसेट पॉईंट हा रस्ता ट्रेकिंगची आवड असणार्‍यांसाठी सुरक्षित रस्ता आहे. त्याचप्रमाणे पेब किल्ला या शिवकालीन गडावरून माथेरान ट्रेकिगचा रस्ता आहे. माथेरानला येण्याचे झाल्यास सीएसटीवरून कर्जत लोकल असून नेरळ येथे उतरता येते तेथून माथेरानला येण्यासाठी टॅक्सी सर्विस उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news