Matheran | इ- रिक्षामुळे माथेरानला वाढले पर्यटन

विकेंडला रिक्षा पडताय कमी
Matheran | E-Rickshaw has increased tourism to Matheran
इ- रिक्षामुळे माथेरानला वाढले पर्यटनPudhari File Photo

माथेरान : माथेरानमध्ये सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षांना पायलट प्रोजेक्ट सुरू आहे व या काळात माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या ही वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे ई-रिक्षा हा माथेरान पर्यटनासाठी संजीवनी देणारा प्रकल्प ठरत असून जास्तीत जास्त पर्यटक या सेवेचा उपभोग घेताना दिसत आहे.

पावसाळी पर्यटनास सुरुवात होताच माथेरानमध्ये पर्यटक विकेंडला गर्दी करीत असतात परंतु आता मधल्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये गर्दी दिसू लागली असून ही रिक्षा सुरू झाल्यानंतर यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूर्वी फक्त सात रिक्षा सुरू होत्या परंतु आता वीस रिक्षा सुरू असतानाही त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मागच्या वर्षी हा प्रकल्प सुरू करण्यात आला, त्यावेळेला डिसेंबर व जानेवारी २०२३ मध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये २५ हजार पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेतला होता व हा त्यावेळचा एक उच्चांकी आकडा होता त्यानंतर हा प्रकल्प काही तांत्रिक कारणांसाठी बंद झाला होता व त्यानंतर येथील व्यवसायिकांना फार मोठ्या मंदिस सामोरे जावे लागले होते

मागच्या वर्षी हा प्रकल्प सुरू करण्यात आला, त्यावेळेला डिसेंबर व जानेवारी २०२३ मध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये २५ हजार पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेतला होता व हा त्यावेळचा एक उच्चांकी आकडा होता त्यानंतर हा प्रकल्प काही तांत्रिक कारणांसाठी बंद झाला होता व त्यानंतर येथील व्यवसायिकांना फार मोठ्या मंदिस सामोरे जावे लागले होते

परंतु आता पुन्हा एकदा हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक व विद्यार्थ्यांसाठी तर हा प्रकल्प वरदान ठरताना दिसत आहे

काही दिवसांपूर्वी ह्या प्रकल्पाला होणारा प्रखर विरोध ही आता हळूहळू शमताना दिसत असून यामुळे माथेरानच्या पर्यटनात क्रांती येणार हे निश्चित आहे. तसेच ई-रिक्षांचा मालवाहतुकीसाठी वापर झाल्यास येथील महागाई आटोक्यात आणण्यासाठी मदत होणार आहे.

ई-रिक्षेचे वेळापत्रक

विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा वेळेत मिळावी व गाड्या चार्ज व्हाव्या यासाठी पर्यटक व रहिवासी याकरिता सकाळी ८ ते दु १.३० वा पर्यंत सुरू राहील. दु१.३० ते ३ वा पर्यंत ई-रिक्षा सेवा बंद राहील. दु ३ ते रात्री १० पर्यंत ई रिक्षा सुरू राहील. शाळेतील विद्यार्थ्यांना आणायचे असल्याने ई-रिक्षा सेवा सायंकाळी ४.१५ ते ५ दरम्यान प्रवाशी वाहतुकीसाठी बंद राहील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news