Matheran News : चार महिन्यांनंतरही माथेरानकरांना सूर्यदर्शन दुर्लभ

अजूनही ढगाळ वातावरण-जिकडेतिकडे धुके; उन्हाळी पर्यटन हंगामात पाऊस पडल्यामुळे पर्यटकदेखील सुखावले
Matheran News
चार महिन्यांनंतरही माथेरानकरांना सूर्यदर्शन दुर्लभpudhari photo
Published on
Updated on

माथेरान : मिलिंद कदम

गिरीशिखरावर वसलेले टुमदार शहर अशी बिरुदावली असलेले पर्यटनस्थळ माथेरानमध्ये वर्षाऋतूत चार महिने जोरदार पाऊस बरसला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत समान पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात तब्बल 5950 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस बरसला आहे.

मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही दरम्यान माथेरान घाटात दरड कोसळण्याची तसेच महाकाय दगड रस्स्यावर आल्याची घटना घडली होती.जास्त पाऊस पडल्यामुळे काळे डोंगर हिरवे दिसू लागले आहेत तसेच खळखळणारे झरे जिकडे तिकडे दिसत आहेत.

Matheran News
Mumbai Goa highway pothole : महामार्गावरील महिसदरा नदीवरील पुलावर खड्डे

यावर्षी अवकाळी पाऊस मे महिन्यापासून सुरू होता.ऐन उन्हाळी पर्यटन हंगामात पाऊस पडल्यामुळे येथे आलेला पर्यटक देखील सुखावला होता.भर उन्हाळ्यात वातावरणात गारवा जाणवत होता त्यातच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झाला.या पावसाळ्यात सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जुलै महिन्यात पावसाचं वेग थोडा वाढलेला दिसला तर ऑगस्ट महिन्यात कधी अतिमूसळधार पाऊस तर कधी अतिवृष्टी झाली. 20 ऑगस्टला 24 तासात तब्बल 438.4 इतका प्रचंड पाऊस बरसला होता.यावर्षात 24 तासात सर्वाधिक पडलेल्या पावसाची नोंद आहे.सप्टेंबर महिन्यात कधी नव्हे तो पाऊस बरसला.यामहिन्यात सर्वात कमी पाऊस होतो पण यावर्षी त्याच्या विपरीत परिणाम पहावयास मिळाला.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळजवळ समान पाऊस झाल्याचे चित्र आहे.यावर्षी मागील वर्षी पेक्षा 23 मिलिमीटर ने पाऊस जास्त झाला आहे.तर 2023 पेक्षा 327 मिलिमीटर पाऊस जास्त आहे असे येथील पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार महापुळे यांनी दिली.दरवर्षी पाऊसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरुवातीपासून झाल्या होत्या पण यावर्षी सप्टेंबर महिन्यात नागरखिंडीत दरड कोसळण्याची घटना घडली दरडीचे प्रमाण कमी होते म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ती दरड त्वरित काढण्यात आली. तर याच महिन्यात वॉटर पाईप रेल्वे स्थानकाच्या वरच्या बाजूला महाकाय दगड डांबरी रस्त्यावर आला.त्यामुळे रस्त्यात खूप मोठा खड्डा पडला.येथील टॅक्सी चालक मालक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून हा रस्ता भरला गेला.

Matheran News
Raigad gold turnover : रायगडमध्ये सोने खरेदीत 50 कोटींची उलाढाल

या पावसाळ्यात आलेले अनेक सण हे पावसात भिजूनच गेले पूर्ण श्रावण महिना, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव,तसेच नवरात्र सुद्धा पावसाच्या सावटातच गेली. आता ऑक्टोबर महिना उलटूनसुद्धा माथेरानकरांना सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. अजूनही ढगाळ वातावरण आणि जिकडे तिकडे धुके दिसत आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरान या पर्यटनस्थळी बरसला आहे.

चार वर्षांतील पाऊस

2022 :- 5566.40 मिलिमीटर

2023 :- 5623.2 मिलिमीटर

2024 :- 5927 मिलिमीटर

2025 :- 5950 मिलिमीटर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news