Matheran Tourism: माथेरानमध्ये आठवडाभरात ४० हजार पर्यटकांनी घेतला पावसाळी पर्यटनाचा आनंद

रविवारच्या सुट्टीमुळेही पर्यटकांचा महापूर; गर्दीमुळे प्रवासी कराचे नियोजन कोलमडले; केरळ येथील तरुणांचा टक्का वाढला
Matheran Tourism
Matheran TourismPudhari
Published on
Updated on

मिलिंद कदम

माथेरान: माथेरानमध्ये या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केलेली दिसून आली असून आज सकाळी रविवार असल्याने येथील प्रवेशद्वारावर प्रवासी कर भरण्याकरिता एकच झुंबड उडाली होती व त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तारांबळ उडाली होती.

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनास मोठा प्रतिसाद भेटत असून दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

Matheran Tourism
Neral Cattle Theft Attempt: रात्रीच्या अंधारात गुरे चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; पाहा व्हिडिओ

खासकरून वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत त्यामध्ये शुक्रवारी केरळ येथील तरुणांचा टक्का वाढला असून दर शुक्रवारीच ही लोक येत असल्याने वीकेंडला गर्दी वाढली आहे तर शनिवार रविवार येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत.

या आठवड्यात 35 ते 40 हजार पर्यंत पर्यटकांनी माथेरानला भेट दिली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे त्यामुळे येथील शासकीय यंत्रणेवर अधिक ताण पडला असून शनिवार रविवार येथील प्रवेशद्वारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असून येथे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे गर्दी नियंत्रणात येण्यास उशीर होत आहे.

येथे एकच गेट असून माथेरान ला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता ही जागा अपुरी पडत असून येथे एकच प्रवेशद्वार असल्याने एक मोठे सुसज्ज इमारत उभी करून प्रवासी माहिती केंद्र, एटीएम, महिलांकरिता दालन व इतर सुविधा उपलब्ध होतील अशी पालिकेची इमारत उभी करण्याची गरज निर्माण झाली असून याकडे नवीन सभागृह लक्ष देणार का अशी विचारणा व्यक्त होत आहे.

Matheran Tourism
Pydhonie Minor Assault: मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सुरक्षा रक्षक अटकेत

माथेरान घाटातील धबधबे प्रवाहित झाले असून माथेरानचा शार्लेट लेक ही ओसंडून वाहू लागला आहे व येथील सुरक्षितता पाहून माथेरान कडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे,त्यामुळे पर्यटकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

तासनतास रांगेमध्ये खोळंबा

प्रवासी करासाठी, ई रिक्षा, मिनी ट्रेन शटल सेवेकरीता या काळात मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. या रांगा ना कंटाळलेला पर्यटकही नाराज होऊन जात आहेत. त्यामुळे ई रिक्षा वाढ बाबत झालेला निर्णय अजून ही अमलात न आल्याने त्याचा फटका पर्यटकांना तासनतास रांगेमध्ये उभे राहण्यास भाग पाडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news