Neral Cattle Theft Attempt: रात्रीच्या अंधारात गुरे चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; पाहा व्हिडिओ

कारसह पसार झालेल्या तिघांविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari
Published on
Updated on

नेरळ: नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनगरवाडी–चाफेवाडी मार्गावर रात्रीच्या अंधारात गुरे चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका जनावराला कारमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे तिघेजण नागरिकांची चाहूल लागताच वाहनासह घटनास्थळावरून भरधाव वेगाने पसार झाले.

या प्रकरणी नेरळ पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Cattle Smuggling
Pydhonie Minor Assault: मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सुरक्षा रक्षक अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनगरवाडी–चाफेवाडी रोड परिसरात रस्त्याच्या कडेला बसलेल्या गुरांपैकी एका जनावराला आरोपींनी त्यांच्या ताब्यातील टोयोटा इटिओस क्र. एमएच-०१-एएक्स-४१३६ या कारमध्ये जबरदस्तीने भरून कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी फिर्यादी व इतर साक्षीदार घटनास्थळी पोहोचल्याने आरोपींचा डाव उधळला. नागरिकांची चाहूल लागताच आरोपींनी तातडीने कारमध्ये बसून भरधाव वेगाने पलायन केले.

Cattle Smuggling
Agriculture Admission: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात

सरकारी साक्षीदारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी कोणतीही पर्वा न करता वाहन भरधाव चालवत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२, ३(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १७९(१) अंतर्गत तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news