Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले

निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप; अश्वचालकांची तक्रार, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले
Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढलेPudhari
Published on
Updated on

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानमधील विविध प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर एम एम आर डी ए च्या आलेल्या फंडातून क्ले पेव्हर ब्लॉक बसवून धूळ विरहित रस्ते बनविण्यात आले होते या रस्त्यांमुळे जमिनीची होणारी धूप थांबली परंतु या रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या ब्लॉक चा दर्जा निकृष्ट असल्याने त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले असून या विरोधात अश्व चालकांनी वारंवार तक्रार करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र माथेरानमध्ये आहे.

Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले
Alphonso Mango Crop Loss: हवामान बदलामुळे रायगडमध्ये 90 टक्के हापूसचे नुकसान

माथेरानमध्ये लालमातीच्या व दगडांच्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने स्थानिक नागरिकांनी धूळ विरहित रस्ते असावे अशी मागणी जोर लावून धरली होती त्या सकारात्मक प्रतिसाद देताना स नियंत्रण समितीने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विविध प्रयोग केल्यानंतर क्ले पेव्हर ब्लॉकने केले गेले ज्यामुळे रस्त्यावरील धूळ तर थांबली परंतु एक ते दीड वर्षानंतर या ब्लॉकने आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली असून या ब्लॉकना चकाकी येऊ लागली असून त्याच्या टणकपणामुळे या वरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या विरोधात स्थानिक अश्वपाल संघटनेने वारंवार तक्रार करूनही त्यास हवा तसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने अश्वचालकांमध्ये तीव नाराजी पसरली आहे.

Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले
Orchestra Bar Ban: नवी मुंबईतील सर्व्हिस व ऑर्केस्ट्रा बार अचानक बंद; अलिखित आदेशामुळे हॉटेल उद्योगात खळबळ

अनेक वेळा चढउताराच्या रस्त्यांवर घोडा घसरून पडल्याने अश्व चालक किंवा पर्यटक जखमी होत आहेत व याला अश्वचालकच जबाबदार ठरवून त्यांच्यावर आरोप ही केले जात आहेत, अश्वचालकांनी वारंवार या ब्लॉक च्या दर्जाबाबत तक्रार केली आहे परंतु ठेकेदाराला अभयच देण्याचे काम झालेले आहे चढउतारांचे रस्ते तर अश्व चालकांसाठी धोकादायक होत चालले असून या ठिकाणी घोड्यांना चालण्यायोग्य रस्ते तत्काळ बनवले जावे अशी जोरदार मागणी स्थानिक अश्वपाल संघटनेकडून केली जात आहे.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावरही कारवाई व्हावी अशीही मागणी समोर येत आहे.

माथेरान बाजारपेठेतून जाणारा महात्मा गांधी मार्गावर अनेक ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉक ची दुरावस्था झाली आहे व या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे काम अर्धवट झालेले आहे.

Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले
Bhatsai Mahadevi Yatra Roha: भातसईत महादेवी मातेच्या पालखी उत्सवाला सुरुवात; १ एप्रिलला भव्य यात्रा सोहळा

दीड वर्षातच क्ले पेव्हर ब्लॉक झाले निसरडे

सनियंत्रण समितीने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार विविध प्रयोग केल्यानंतर क्ले पेव्हर ब्लॉकने केले गेले ज्यामुळे रस्त्यावरील धूळ तर थांबली परंतु एक ते दीड वर्षानंतर या ब्लॉकने आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली असून या ब्लॉकना चकाकी येऊ लागली असून त्याच्या टणकपणामुळे या वरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news