

माथेरान ः माथेरान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांचे नाव निश्चित झाले असून शिवसेना शिंदे गटाकडून शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी हेच उमेदवार असतील असे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केल्यानंतर मुख्य निवडणुकीचा धुरळा आता माथेरान मध्ये उडाला आहे.
अनेक वर्षे राजकारणामध्ये सक्रिय असलेले श्री अजय सावंत यांना माथेरानमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये सक्रिय असल्यामुळे प्रशासकीय कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे त्यामुळे सध्या तरी त्यांचे पारडे जड वाटत असले तरी शहरप्रमुख श्री चंद्रकांत चौधरी यांचा नवा चेहरा त्यांना तगडी लढत देणार हे निश्चित आहे कारण त्यांचे अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये संघटनात्मक काम आहे अनेक तरुण वर्गाला मदतीसाठीते सदैव तत्पर असतात.
त्यामुळे तरुणाईची मोठी ताकद त्यांच्या पाठी उभी आहे शिवसेना भाजप यांची युती झाल्यामुळे त्यांना मोठी ताकद मिळाली असून या नगरपालिके मध्ये दे चमत्कार घडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
दोन्ही उमेदवारांना सध्या आवाहन स्वतियांकडून विरुद्ध मतदान होण्याचे असून हे थांबविल्यास दोघांनाही त्याचा फायदा होऊ शकतो परंतु सध्या घोडेबाजारचा जमाना असल्यामुळे विरुद्ध मतदान हे होणारच, यामध्ये जो उमेदवार अधिक मतदारांपर्यंत पोहोचेल त्यालाच त्याचा फायदा होणार आहे.माथेरान पर्यटन विकास हा मोठा मुद्दा सध्या माथेरानकरांना भेडसावत आहे जो या मुद्द्याला हात घालेल व माथेरान करांची मने जिंकेल त्यालाच भरघोस मतदान होणार आहे.