Matheran leopard sighting | माथेरान: बिबट्याने श्वानाची शिकार करून नेताना दर्शन

एक मादी, दोन बच्चे अशा तीन बिबट्यांचे वास्तव्य; वन विभागाकडून खबरदारीचे आवाहन
Matheran leopard sighting
Matheran leopard sightingpudhari photo
Published on
Updated on

नेरळ : जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान घाट रस्त्यामध्ये रात्रीचे सुमारास बछडा बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असताना, बिबटया हा पुन्हा एका श्वानाची शिकार करून मृत श्वानाला घेऊन जातानाचे तसेच माथेरान घाट रस्ता परिसरात ही बिबटयाचा मुक्त संचाराचे दर्शन झाले आहे. माथेरान डोंगरातील जंगल भागात एक मादी व दोन बच्चे असे तीन बिबट्यांचा वावर असल्याने, रात्रीचे सुमारास माथेरान घाट रस्त्यावर तसेच जंगल भागात एकटे न जाता समुहाने जाण्याचे व वन विभागाच्या सुचनांचे पालन करण्याचे वन विभागाकडून नागरिकांना आहवान करण्यात आले आहे.

14 एप्रिल रोजी माथेरानच्या घाटरस्त्यामध्ये रात्रीचे सुमारास बिबटयाचे दर्शन हे ट्रॅक्सी चालकाला झाले असताना, पुन्हा एकदा माथेरान मधील सनसेट पॉईंटच्या खालच्या बाजूला एका बिबट्याला श्वानाची शिकार करून त्या मृत श्वानाला घेऊन जाताना एका प्रत्यक्ष पाहील्याचे तर माथेरान घाट रस्त्याच्या परिसरातील जंगल भागामध्ये बिबटयाचा मुक्त संचाराचे दर्शन एका आदिवासी बांधवाला झाले असल्याने, सदर माहिती ही वन विभागाला दिली असता, त्या भागात वन अधिकारी यांनी बिबट्याच्या संचारा संदर्भातील तपासणी व पाहीणी केली आहे.

Matheran leopard sighting
Leopard Attack | देवळाली कॅम्प हादरले! संसरी गावात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद झाला पाळीव कुत्र्यावरील थरारक हल्ला

माथेरान डोंगर भागातील जंगल परिसरात एक मादी व दोन बच्चे असा तिन बिबट्यांचा वावर असल्याचे, व ते पाण्याच्या शोधा मध्ये सनसेट पॉईंटच्या खालच्या भागासह इतर पाण्याचे ठिकाणी प्रयान करीत असल्याचे, व गार्बट वाडीच्या खालच्या परिसरात दगडाच्या कपरीमध्ये त्यांचा वास्तव असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Matheran leopard sighting
Leopard News : बिबट्याचा थरार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news