Matheran Rain: माथेरानमध्ये पावसाची जोरदार हजेरी

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर माथेरानमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी लहान-मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
Matheran Rain
Matheran RainPudhari
Published on
Updated on

मिलिंद कदम

माथेरान: बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारनंतर माथेरानमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांमध्ये आनंदाची लाट होती तर लहान मोठ्या व्यवसायिकांची मात्र पाऊस आल्याने तारांबळ उडाली.

मागील काही दिवसांपासून येथील शार्लेट लेक स्वच्छता खाली केल्यामुळे माथेरानकरांना पाणीटंचाई सामोरे जावे लागले होते त्यातच पावसाने दडी मारल्यामुळे पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली होती,हा तलाव स्वच्छ केल्यानंतर त्याचे गेट बंद करण्यात आले होते परंतु पाऊस नसल्याने तलाव केव्हा भरणार याची चिंता स्थानिकांना लागली होती.

Matheran Rain
Mithai Price Hike: आगामी सणासुदीत मिठाई २० टक्क्यांनी महागणार? साखरेसह गॅस, दुधाच्या दरवाढीचा फटका

गोकुळाष्टमी व दहीहंडी या सुट्ट्या सलग लागून आल्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय लॉजिंग व्यवसाय पाण्याअभावी चिंतेमध्ये होते परंतु आज जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे काही यांची येथील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

Matheran Rain
Hospital Slab Collapse: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळून रुग्ण गंभीर जखमी

येथील शार्लेट लेक परिसरामध्ये असलेले रिवर्स वॉटर फॉल व शार्लेट लेक चा ओव्हर फ्लो धबधबा हा येथील पावसाळी पर्यटन करिता महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे परंतु सध्या हे सर्व बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी होती परंतु आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच माथेरानच्या आकर्षण सुरू होईल असे अशा स्थानिकांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news