

नेरळ : आनंद सकपाळ
नेरळ माथेरान घाट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हे पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र या पावसाळ्यामध्ये या घाट रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने, माथेरान घाट रस्त्याच्या वळणासह काही ठिकाणी मोठया खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने, माथेरान घाट रस्त्यावरून मुंबई आदी शहर व राज्यातून येणाऱ्या पर्यटकांसह नेरळ टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या टॅक्सीचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तर या खड्डयांमुळे काही वाहानांसह दुचाकी वाहनांना आपघात देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या संदर्भात तशा बातम्या देखील काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. तर माथेरान घाट रस्त्याच्या डागडूजीचे काम हे राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या हॅबिट एनयूटी या संस्थेच्या माध्यमातून ठेका प्राप्त रिपलान प्रोजेक्ट या कंपनीच्या अंतर्गत काम हे दि. 23 डिसेंबरच्या 2025 च्या रात्री ब्लॉक घेऊन ब्लॉक घेऊन सुरू केले आहे. मात्र रिपलान प्रोजेक्ट या ठेका प्राप्त कंपनीकडून करण्यात आलेले काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.
दुसऱ्याच दिवशी डांबर नसलेल्याने खडी ही खड्डयांमधून वेगळी होऊन रस्त्यावर पसल्याने, मात्र नाताळचा सिजन असल्याने, माथेरान मध्ये मोठया प्रमाणात येणाऱ्या पर्यटक, नेरळ येथील टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या टॅक्सी चालकांसह दुचाकी वाहाने ही या पसलेल्या खडीवरून घसरत असल्याने, व दुसरीकडे घाट रस्ता असल्याने, वाहन चालवताना तारेवरची कसरत करून जीव हा मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या काळजीने नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पोलकम यांच्यासह त्यांचे टॅक्सी चालक सहकारी हे घाट रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना व दुचाकी चालकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची वाहाने सुरक्षित रित्या काढण्यासाठी कार्यरत होते.
माथेरान घाट रस्त्यावरून तारेवरची कसरत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने, या निकृष्ठ काम करणाऱ्या व पर्यटकांसह वाहन चालकांवर जीव घेणा प्रवास करण्याची वेळ आणणाऱ्या कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
जीव घेणा प्रवास
23 डिसेंबरच्या रात्री ब्लॉक घेऊन ब्लॉक घेऊन निकृष्ठ दर्जाचे कामामुळे पर्यटक, दुचाकी चालक व टॅक्सी चालक यांना माथेरान घाट रस्त्यावरून तारेवरची कसरत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने, या निकृष्ठ काम करणाऱ्या व पर्यटकांसह वाहन चालकांवर जीव घेणा प्रवास करण्याची वेळ आणणाऱ्या रिपलान प्रोजेक्ट कंपनीकडे लोकप्रतिनिधी व संबंधीत विभागाचे अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल हा नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.