Shambhuraj Desai : माथेरानला ई-रिक्षा तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करा

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश, मंत्रालयात बैठक
Shambhuraj Desai e-rickshaw order
माथेरानला ई-रिक्षा तातडीने सुरू करण्याची कार्यवाही कराpudhari photo
Published on
Updated on

माथेरान : माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांची कामे स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई-रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून ई-रिक्षा सुरू करण्यासाठीची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधा व माथेरान मधील स्थानिक समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. देसाई म्हणाले की, माथेरान हे पर्यटनदृष्ट्‌‍या महत्वाचे असलेले शहर आहे. येथे पर्यटनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो पर्यटक भेटी देत असतात हे लक्षात घेता येथील स्थानिक पर्यटन विषयक महत्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची कामे गतीने करण्यात यावीत. वाहनतळासाठी आरक्षित असलेला भूखंड विनामोबदला माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याकरिता महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने कार्यवाही करावी तसेच या ठिकाणी असलेली अतिक्रमणे त्वरीत हटवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीने ऑफलाईनही बैठक आयोजित करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

Shambhuraj Desai e-rickshaw order
Maharashtra Local Body Election 2025: पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज, सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार?

बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, दूरदृश्यप्रणालीव्दारे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा चालकमालक संघटना माथेरानचे सचिव सुनिल शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंद प्रसाद थोरवे, चंद्रकांत चौधरी , जहूर चिपाडे, युवा सेना गौरंग वाघेला हे देखील उपस्थित होते.

पायाभूत सुविधा पुरवा

या बैठकीत महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटनविकासाशी निगडित विविध महत्त्वाचे विषय उपस्थित केले आणि माथेरानसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. कर्जत तालुका हा पर्यटन घोषित करावा अशी महत्त्वपूर्ण मागणीही त्यांनी मंत्री महोदयांसमोर मांडली.यामध्ये माथेरान वाहनतळ, लॉजिस्टिक हब आणि बसस्टँडसाठी भुखंड क्र. 93 (सि.स.न.) चे हस्तांतरण, माथेरान नगरपरिषदेच्या ताब्यात हा भुखंड विनामोबदला देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

Shambhuraj Desai e-rickshaw order
Subhash Bhoir joining BJP : माजी आमदार सुभाष भोईर भाजपाच्या वाटेवर?

पर्यावरणीय दृष्टीने माथेरान हा संवेदनशील परिसर असल्याने त्यासाठी नवीन पर्यावरणीय संनियंत्रण समिती गठित करण्याची गरज असल्याचे आमदार थोरवे यांनी निदर्शनास आणून दिले. बैठकीत वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित विभागांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

धोधाणी ते माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प

एम.एम.आर.डी.ए. द्वारे प्रस्तावित या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर कार्यवाही तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे पर्यटकांना माथेरानपर्यंत पोहोचणे सोयीस्कर होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. माथेरानमधील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी क्ले पेवरब्लॉकच्या कामांना मंजुरी व अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news