Raigad Missing Woman | आंबेवाडी आदिवासीवाडीतून विवाहित महिला बेपत्ता

अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल; कोलाड पोलिसांकडून शोध सुरू
Raigad kidnapping cases
Raigad kidnapping casesPudhari
Published on: 
Updated on: 

Roha Married Woman Missing

कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथून विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या या महिलेचा नातेवाईकांनी तसेच परिसरात शोध घेऊनही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कोलाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील इंदापूरजवळील रातवड आदिवासीवाडी येथील फिर्यादी यांच्या बहिणीचा विवाह रोहा तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथील तरुणाशी झाला होता. विवाहानंतर ती पती आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती. दरम्यान, संबंधित महिला राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेली.

Raigad kidnapping cases
Raigad News : उरण तालुक्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रकोप

बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे सासरच्या तसेच माहेरच्या नातेवाईकांनी परिसरातील विविध ठिकाणी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडे तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र चौकशी करूनही तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

अखेर अज्ञात व्यक्तीने महिलेला आमिष दाखवून किंवा फूस लावून तिच्या पतीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर फिर्यादी यांनी कोलाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Raigad kidnapping cases
Raigad Fort News | किल्ले रायगडावर साताऱ्यातील शिवभक्ताचा पाय घसरून मृत्यू

या तक्रारीवरून कोलाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आंबेवाडी आदिवासीवाडी परिसरात खळबळ उडाली असून, बेपत्ता महिलेचा तातडीने शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार बांद्रे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news