Raigad Fort News | किल्ले रायगडावर साताऱ्यातील शिवभक्ताचा पाय घसरून मृत्यू

शाश्वत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते; हत्ती तलावाजवळ घडली दुर्घटना
 Death  News
Death News Pudhari
Published on
Updated on

Satara Shivbhakt Death

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शाश्वत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या ६५ वर्षीय शिवभक्ताचा पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी (दि.२४) घडली. दिलीप शंकर गोसावी (वय ६५, रा. पुसेसावळी, जि. सातारा) असे मृत शिवभक्ताचे नाव आहे.

किल्ले रायगडावर आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा शाश्वत राज्याभिषेक सोहळा पार पडला. सोहळ्यानंतर रोपवे बंद असल्याने गोसावी हे गडावरून पायी खाली येत होते. यावेळी हत्ती तलावाजवळील निसरड्या पाऊलवाटेवर त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

 Death  News
Raigad News : उरण तालुक्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रकोप

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने पाताळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती महाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्ताच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news