Manoj Jarange Patil | 'संतोष देशमुख यांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार' मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil | किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "देशमुख कुटुंबीयांनी आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilonline pudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil

महाड (श्रीकृष्ण द बाळ) : बीड जिल्ह्यातील माकसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आणि त्यांच्या कुटुंबाला आजवर न्याय न मिळण्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil
Kokan Sakav Development | कोकणातील साकवांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र आराखड्याची तयारी; मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, "देशमुख कुटुंबीयांनी आपली भूमिका ठामपणे मांडली पाहिजे. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत आरोपींवरून मोक्का काढून घेऊ दिला जाणार नाही."

रायगडावर दोन भाविकांना भोवळ:
शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमादरम्यान दोन भाविकांना भोवळ आल्याने त्यांना तातडीने रोपवेने खाली आणण्यात आले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याची विचारपूस स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil
Coca Cola Plant Lote MIDC: कोका- कोला विरोधात कोकणचे स्थानिक आक्रमक, भुमिपूत्रांना नोकरी मिळावी यासाठी मूकमोर्चा

२९ ऑगस्टला आरक्षण मिळणार १०० वर्षांसाठी फायदेशीर ठरेल

मराठा समाजाला २९ ऑगस्ट रोजी आरक्षण मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत, जर हे आरक्षण मिळालं तर पुढील १०० वर्षांसाठी समाजासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. "आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी नाही. हे आमचा हक्क आहे आणि ते घेऊनच दाखवू. कोणीही अडवू शकत नाही," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मनोज जरांगे पाटील रायगडावर महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले होते. त्यांनी स्पष्ट केलं की, राज्य भयमुक्त आणि सुव्यवस्थित राहावे, यासाठी आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर आलो आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news