

माणगाव: माणगावात बसविलेले स्मार्ट मीटर वीज मंडळाने काढून टाकावेत जोपर्यंत जबरदस्तीने ग्राहकांच्या घरी बसविण्यात आलेले हे स्मार्ट मिटर विज वितरण कंपनी काढून टाकत नाही तोपर्यंत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
माणगाव शहरातील अनेक गावातील घरांतून विजेचे स्मार्ट मिटर जबरदस्तीने विजवितरण कंपनीने बसविले आहे. या मिटरमुळे वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले येत आहेत. हे मिटर बसविण्या अगोदर जे जुने मिटर होते.
त्यांचे बिल पाहता या स्मार्ट मीटरचे जवळपास चौपट वीज बिल ग्राहकांना येत आहे. त्यामुळे वीज ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत. काहींचा तर भरमसाठ वीज बिलामुळे महिन्याच्या खर्चाचे वेळापत्रक कोलमडले आहे.
हे स्मार्ट वीज बिल सर्व गावांतून सर्व ग्राहकांच्या घरी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातून बसविण्यात येथील असे स्मार्ट मिटर बसविण्यात येतील यात कोणाला सूट नाही असे स्मार्ट मिटर बसविण्यात आलेल्या ग्राहकांना सुरवातीला सांगण्यात आले. माणगाव शहरात तीन महिन्यांपूर्वी अनेक गावांतील घरांतून स्मार्ट मिटर बसविण्यात आले.
मात्र माणगाव तालुक्यातील अनेक गावे तसेच शहरातील अनेक घरे याठिकाणी स्मार्ट मिटर बसविण्यात आलेले नाहीत. हे स्मार्ट मिटर बसविणे कोणत्याही प्रकारचे बंधनकारक नसतानाही काही वीज ग्राहकांच्या माथी हे स्मार्ट मिटर लादण्यात आले. सुरुवातीला या मिटरमुळे तुम्हाला योग्य ते बिल येईल असे ग्राहकांना सांगण्यात आले. परंतु जेव्हा भरमसाठ वीज बिले आली तेव्हा मात्र ग्राहकांची झोपच उडाली.
भरमसाठ आलेले वीज बिले पाहून ग्राहकांना एक प्रकारे धक्काच बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्मार्ट मिटरमुळे ग्राहकांनी उद्रेक केल्यावर तेथील वीज ग्राहकांना पुन्हा जुने मिटर देण्यात आले. तशा प्रकारे जुने मिटर पुन्हा माणगाव शहरात बसविण्यात यावे. तसेच माणगाव शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने याठिकाणी शहरात स्वतंत्र सबस्टेशन असणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करीत माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे यांनी ता. १ ऑगस्ट २०२६ रोजी वीज वितरण कार्यालय माणगाव याठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत जुने मिटर ग्राहकांच्या घरी पुन्हा वीज वितरण कंपनी बसवीत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मी स्वीकारलेला उपोषणाचा हत्यार यामध्ये माघार नाही.
रणधीर कनोजे यांच्या या उपोषणाला माणगाव तालुका पत्रकार संघाबरोबरच शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला असून हजारोंच्या संख्येने वीज ग्राहक या उपोषण स्थळी भेट देणार आहेत.
या उपोषणाची तयारी पूर्ण झाली असून जोपर्यंत वीज मंडळाकडून समाधानकारक उत्तर व प्रत्यक्ष कृती होत नाही तोपर्यंत हा समाजसेवी लढा आपण सहकार्याने सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते रणधीर कनोजे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना ठामपणे सांगितले. या उपोषणाबाबतचे निवेदन संबंधितांना रणधीर कनोजे यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराला स्वतंत्र सबस्टेशनची आवश्यक
भरमसाठ आलेले वीज बिले पाहून ग्राहकांना एक प्रकारे धक्काच बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्मार्ट मिटरमुळे ग्राहकांनी उद्रेक केल्यावर तेथील वीज ग्राहकांना पुन्हा जुने मिटर देण्यात आले. तशा प्रकारे जुने मिटर पुन्हा माणगाव शहरात बसविण्यात यावे. तसेच माणगाव शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने याठिकाणी शहरात स्वतंत्र सबस्टेशन असणे आवश्यक आहे.