Smart Meter Controversy: स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? घर बंद, तरीही बिल दणक्यात!

महावितरणने मीटर बसवला, पण वीज ग्राहकांचा विश्वास गमावला!
Smart Meter
Smart MeterPudhari
Published on
Updated on

नेरळ: महावितरणकडून वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत - की आर्थिक फटका देत आहेत, असा प्रश्न आता राज्यभरातील अनेक वीज - ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

कर्जत तालुक्यात जुने वीज मीटर खराब झाल्यानंतर त्यांच्या जागी - नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरण आणि अदाणी एनर्जी - सोल्युशन्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या - संमतीशिवाय मीटर बसविण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत असून, विरोध करणाऱ्या काही ग्राहकांशी कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याची चर्चा देखील परिसरात सुरू आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Smart Meter
Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली सापळा; तरुणींनी सोशल मीडियावर सावध राहण्याची गरज

नवीन तंत्रज्ञानामुळे वीज वापराचे अधिक अचूक मोजमाप होईल आणि ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा वीज ग्राहकांकडून व्यक्त केली जात होती. परंतु स्मार्ट मीटर बसवि ल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वर्वीपेक्षा

जास्त वीज बिले येत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, काही ग्राहकांची घरे बहुतांश काळ बंद असतात किंवा त्यांचा वीज वापर अत्यंत मर्यादित असतो. असे असतानाही जुन्या मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरनुसार आकारण्यात येणारे वीज बिल अधिक येत असल्याचा दावा ग्राहकांकडून केला जात आहे.

त्यामुळे घर बंद असताना किंवा वापर नगण्य असताना वाढीव वीज बिल कसे येते, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात महावितरणकडे विचारणा केल्यास मीटर तपासण्याचा सल्ला दिला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर खरोखरच अचूक आहेत का? घरात वापर नसताना युनिट्सची नोंद कशी

वाढते? ग्राहकांना येणारी वाढीव बिले कोणत्या निकषांवर आकारली जात आहेत? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने स्मार्ट मीटर प्रणालीची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी ही विज ग्राह-कांकडून होत आहे.

Smart Meter
Thane Landslide Risk: जिल्ह्यातील पावणेतीन लाख लोकांना सतावतेय दरडींची भीती

तसेच वाढीव बिलांच्या तक्रारी असलेल्या मीटरची शासनस्तरावरून प्रयोगशाळांच्या माध्यमातून तपासणी करून रिडिंग-मधील तफावतीचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची भावना वाढत असेल, तर त्याची गंभीर दखल घेणे ही महा-वितरणची प्रमुख जबाबदारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news