

सुधागड: परतीच्या पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा पुरता हातबल झाला आहे. अनेकाचे उभे भात पीक शेतातच कुजले तर काहींचा भात पुन्हा उगवले मात्र या सगळ्यांमध्ये भाजणी झाल्यावर निघणारा पेंढा उरलाच नसल्यामुळे गुरांच्या वरणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्यामुळे बळीराजा आणि पशुपालक प्रचंड चिंतेत आहेत.
काही जणांना उरलासुरलेला भात काळा पडला आहे, त्यामुळे त्यास बाजारात अत्यल्प किंमत मिळेल तसेच भिजलेल्या पेंढ्यामुळे गुरांची वैरण गेली आहे, उभे भात पीक सडल्याने आता पेंडाच उरला नाही शिवाय भिजल्याने तो खाण्यायोग्य व साठवण्यासाठी योग्य राहिला नाही मग आता पशुधनाला खायला तरी काय घालायचे कारण पावसाळ्यानंतर जनावरासाठी पेंडा हे महत्त्वाचे खाद्य आहे पण आता पेंडाच नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे.
आता पशुधनाला पेंड्याऐवजी सरकी किंवा शेंगदाणा पेंड किंवा सोयाबीन ढेप आधी पर्यायी खाद्य जावे लागेल मात्र त्यांच्या किमती प्रचंड आहेत तसेच उपलब्ध असलेल्या पेंढ्यांचे भाव देखील वाढले आहेत. परिणामी आधीच गांजलेल्या शेतकरी पशुपालकांना अतिरिक्त खर्चाचा भार पडणार आहे शिवाय दूध व्यवसायाचे नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांनी खाण्यासाठी ठेव लेला भात खराब झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेल आली आहे तसेच हाती पैसा नसल्याने कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हीदेखील भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे आणि आता दूध दुखते पदार्थ विकून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक हातभार लागतो तो देखील पेंड्या अभावी कमी होणार आहे.
त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसान भरपाईवर जनावरांच्या खाद्याची व्यवस्था देखील करावी तसेच गरज असले तेथे चारा छावण्या उभाराव्या अशी मागणी सुधागड तालुका कृषी मित्र संघटनेचे अध्यक्ष शेतकरी शरद गोळेे यांनी केली आहे.