

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
लडाखसारख्या रणभूमीवर जीवाची बाजी लावून देशवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांशी संवाद साधण्याबरोबरच तेथे शहीद झालेल्य जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्याची संधी महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांना नुकतीच लाभली.तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या जवानांच्या शौर्यगाथा ऐकून या छायाचित्रकारांच्या अंगावर रोमांचे उभे राहिले.
महाराष्ट्रातूल नावाजलेले फोटाग्राफर यांची सहल नुकतीच लेह लडाख येथे नामवंत छायाचित्रकार वैभव जागुष्टे यांनी आयोजित केली . जगातील विविध निसर्ग टिपणे व सुंदर छायचित्रे जगासमोर आणणे हा उद्देश या सहलीची आहे. परंतु लडाखच्या बर्फाच्छादित सियाचीनमध्ये जेव्हा हे छायाचित्रकार पोहोचले त्यावेळी तेथील हवामान आणि जवानांचे तेथील वास्तव पाहून सारेच थक्क झाले.शिवाय त्यांच्या पराक्रमांच्या गाथांनी मनही प्रसन्न झाले.
देशाच्या अन्य भागात कडक उन्हाळा असला तरी लेह, लडाख येथील तापमान उणे ५. ५ अंश सेल्सिअस इतके आहे. या कडाक्याच्या थंडीतही जीवाची पर्वा न करता हजारो जवान भारतीय सीमेवर जीवाची बाजी लावून देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दिसून आले. ती माहिती समरकतील जवानांनी दिली तेव्हा डोळ्यात पाणी आले .
येथे शोकाडो सैनिक लढता लढता बर्फात शहीद झाले ,त्याच्या इतिहासाची कहाणी जवानांकडून ऐकण्याचे भाग्य आम्हा फोटोग्राफेर्सना लाभले सर्वानी डोळ्यात पाणी आणून आदरांजली वाहिली. यावेळी वैभव जागुष्टे ,संजय जागुष्टे , संजय सकपाळ , प्राची मोरे , डॉ श्री मोरे , राजेंद्र वाघमारे ,तावनीत कौर ,आयेशा कौर ,यांनीही शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
भारतीय संरक्षण दलाच्या वतीने दरवर्षी ही मोहीम आयोजित केली जाते, तीच मुळी तरुणांच्या साहसी आणि विजिगीषू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी. सियाचिन ग्लेशियर ट्रेकिंग मोहीम फत्ते करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा पूर्ण कस लागतो. समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर जायचे असल्याने आपली मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती खूपच महत्त्वाची ठरते.
अशा मोहिमांमध्ये वातावरणाशी एकरूप होणे ही एक मोठी कसोटी असते. आजवर फारच थोडय़ा लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. अतिशय कठीण निकषांच्या आधारे संपूर्ण भारतातून केवळ २५ ते ३० जणांचीच यासाठी निवड केली जाते. यामध्ये जिगरबाज युवतींचाही सहभाग असतो.
लडाख, सियाचीन डोळ्यांचे पारणे फेडणारा...
सियाचीन ग्लेशिअर ट्रेकिंग या मोहिमेची सर्वात पहिली बॅच २००७ मध्ये गेली होती. त्याचवर्षी आर्मी माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूटची स्थापना जे. जे. सिंग मार्गदर्शनाखाली झाली. तेव्हापासून मोहिमेची प्रत्येक वर्षी एक बॅच जात असे. या ट्रेक दरम्यान लडाख, सियाचीनपर्यंतचा प्रवास डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतो. लडाख म्हणजे हिमा लय आणि काराकोरममधले घरटेच आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेले, पृथ्वीवरील एक अवर्णनीय अशी ही जागा. छायाचित्रकारांसाठी तर हा प्रदेश एक नजाराच आहे.