Railway Charging Point: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे डब्यांतील रात्री चार्जिंगवर बंदी; पॉवर बँक स्फोटानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

पॉवर बँक स्फोटाच्या घटनेनंतर अग्निसुरक्षेसाठी रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान चार्जिंग पॉइंट्स बंद ठेवण्याचे आदेश
Railway Charging Point
Railway Charging PointPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: रेल्वे गाड्यांमधील अग्निसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे प्रशासनाना महत्त्वाचे निर्देश बुधवारी दिले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वे डब्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉइंट्स बंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दक्षिण पूर्व रेल्वे मार्गावरील एका ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेत चार्जिंग पॉइंट्स बंद न केल्यामुळे स्फोट होऊन डब्यात धूर पसरला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Railway Charging Point
Maharashtra Legislative Council Election: विजयापेक्षा काँग्रेसचे 'नरेटिव्ह' निकाली निघाल्याने भाजपला समाधान

रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या 'प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर्स'ना पाठवलेल्या या पत्रात, रात्रीच्या वेळी रेल्वे डब्यांमध्ये कोणाचेही लक्ष नसताना चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवासी झोपलेले असतात, तेव्हा या सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

त्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना अचानक पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या नवीन निर्देशानुसार, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही याची थेट जबाबदारी रेल्वे कर्मचारी आणि पर्यवेक्षक अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

Railway Charging Point
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर; दिवाळीपूर्वी पैसे मिळणार

रेल्वे डब्यांमध्ये २४ तास चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध असल्यामुळे प्रवासादरम्यान होणारे विद्युत अपघात आणि संभाव्य आगीचा धोका टाळण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आदेश पत्रात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news