

महाड : प्रथम विधानसभा नंतर नगरपरिषद व आता होणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाड तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असाच थेट सामना होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत असून या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका महत्त्वपूर्ण राहील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
या निवडणुकांकरिता महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आता प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस जगताप कुटुंबीयांपासून फारकत घेतलेल्या शहर तसेच ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या संख्येनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकांमध्ये जोरदार तयारी केली आहे.
एकीकडे मागील तीन निवडणुकांपासून सरसकट विजय या दोन्ही निवडणुकांमध्ये प्राप्त केलेल्या शिवसेनेने मंत्री भरतशेठ गोगावले व युवा नेते विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड नगर परिषदेवर भगवा फडकविल्यानंतर ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे मनोधैर्य अधिक वाढल्याचे दिसून येते.
विकास गोगावले हे रायगड विभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे या पूर्वीचा नाते व विद्यमान नडगाव तर्फे बिरवाडी या जिल्हा परिषद मतदारसंघासह संपूर्ण तालुक्यातील युवासैनिकांमध्ये एकच जोष निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.
या निवडणुकी संदर्भात महाड प्रांत अधिकारी कार्यालयातून प्राप्त झालेल्या मतदारांच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती साठी एकूण मतदारांच्या 1 लाख 39 हजार 446 मतदारांमध्ये 69,185 पुरुष तर 70, 261 स्त्री मतदार नोंदविण्यात आले आहेत. प्राथमिक स्थितीमध्ये महाड तालुक्यात तसेच शेजारील पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणाऱ्या निवडणुका या पुन्हा एकदा मंत्री भरत शेठ गोगावले विरुद्ध जगताप व खासदार सुनील तटकरे कुटुंबीय यांच्या विरोधातच हा सामना रंगणार आहे असे आहे जि.प. आरक्षण महाड तालुक्यात पाच जिल्हा परिषद मतदार संघ असून बिरवाडी व खरवली हे दोन मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करता आरक्षित आहेत. दासगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग ,तर नडगाव तर्फे बिरवाडी व करंजाडी हे दोन मतदारसंघ सर्वसाधारण म्हणून घोषित झाले आहे.
धामणे अनुसूचित जमाती, बिरवाडी - सर्वसाधारण, वरंध - सर्वसाधारण , खरंवली - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री , नडगाव तर्फे बिरवाडी - सर्वसाधारण स्त्री , नाते - सर्वसाधारण, दासगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग , अप्पर तुडील - सर्वसाधारण स्त्री , करंजाडी सर्वसाधारण - विन्हेरे सर्वसाधारण स्त्री