Mahad Youth Rescue | फिरायला गेले अन्‌ पुरात अडकले; काळ नदीपात्रात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश

Mahad flood rescue | फिरायला गेले अन्‌ पुरात अडकले; काळ नदीपात्रात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश
Mahad Youth Rescue
Mahad Youth Rescue
Published on
Updated on

महाड : महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये आकले गावच्या पाठीमागील बाजूस काळ नदीपात्रात एका बेटावर दोन तरुण फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये आदिल शकील खान वय 27 रा. मधले आवड बिरवाडी व नशिमउल्ला यतिमउल्ला खान 32 रा. टेमघर मूळ रा. उत्तरप्रदेश अशी दोघांची नावे आहेत.

Mahad Youth Rescue
Virar Arnala beach drowning: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर ४ मुलं बुडाली

दोघेही संध्याकाळी ५ वाजता फिरण्यासाठी गेले होते अचानक बेटाच्या बाजूने नदीपत्रात पूर आल्याने दोघे जण पाण्याच्या प्रवाहात अडकले.

या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजतात त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस मदत आणि एनडीआरएफ पथक तसेच नौका विभाग पथक, आपत्ती व्यवस्थापन टीम महाड, फायर ब्रिगेड टीम एमआयडीसी यांच्या मदतीने या तरुणांचे रेस्क्यू करून त्यांना पाण्याच्या बाहेर सुखरूप काढले. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Mahad Youth Rescue
Koparkhairane slab collapse : कोपरखैरणेत ३० वर्षे जुन्या इमारतीचा कोसळला स्लॅब : मोठी दुर्घटना टळली

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नागरिकांनी नदीपात्र किंवा धबधबे अशा ठिकाणी जाताना सुरक्षेचा उपाय म्हणून काळजी घ्यावी, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news