Mahad River Pollution : महाडमधील नद्या अडकल्यात प्रदूषणाच्या विळख्यात

घनकचरा निर्मूलन यंत्रणा ग्रामीण भागात अत्यावश्यक; प्रदूषण करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात प्रशासन अपयशी
Mahad River Pollution
Mahad River Pollutionpudhari photo
Published on: 
Updated on: 

महाड : श्रीकृष्ण बाळ

मागील शंभर वर्षात प्रथमच संपूर्ण राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाची चिन्हे दिसू लागत असतानाच महाड तालुक्यातील सावित्री काळ गांधारी या नदीपात्रा वर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना नदीकिनारी होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्याने नव्या समस्येला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. दरम्यान यासंदर्भात प्रदूषण करणाऱ्या च्या विरोधात कारवाई करण्यास स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच या निमित्ताने केलेल्या पाहणी मध्ये स्पष्टपणे दिसून आले.

यासंदर्भात तालुक्याच्या विविध भागात केलेल्या प्रत्यक्ष पाहणी वेळी असे निदर्शनास आले की यासंदर्भात महाड नगर परिषदेचा असलेला लाडवली येथील घनकचरा प्रकल्प सोडल्यास तालुक्यात अन्यत्र कोठेही घनकचरा प्रकल्प अस्तित्वात नसल्याने या कचऱ्याची विल्हेवाट संबंधित ग्रामपंचायतीमधील यंत्रणांकडून नदीकिनारी टाकली जात असल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.

Mahad River Pollution
MP Sunil Tatkare : नवीन जिल्हा झाल्यास माणगावच मुख्यालय

नदी किनारे स्वच्छ राहिल्यास या ठिकाणी नव्याने शेती व्यवसाय आहे मच्छीमारी व पर्यटन क्षेत्राला संधी उपलब्ध होणार आहे मात्र सद्यस्थितीमध्ये महाड तालुक्याच्या विविध गावातील नदी किनारे हे भीषण कचऱ्याच्या प्रदूषणामध्ये अडकल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी काळात दुष्काळा बरोबरच या नवीन संकटावर मात करण्यासाठी शासनाला वेळीच प्रत्येक पंचायत विभागामध्ये घनकचरा प्रकल्प निर्माण करण्याकरता धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल असे मत या क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.

महाड तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ आणि गांधारी या प्रमुख नद्यांचे किनारे परिसरातील गावांमधून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. नदीकिनारी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून, त्यातील प्लास्टिक, रासायनिक कचरा आणि अन्य घातक पदार्थ थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषणात केवळ औद्योगिक क्षेत्रच नव्हे, तर शहर आणि परिसरातील गावांचाही मोठा वाटा असल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कचरा संकलन, वर्गीकरण, विघटन आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाड तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारी या तिन्ही नद्या महाड शहर आणि औद्योगिक परिसरातून वाहत आहेत. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक ठिकाणी त्यांची देवीच्या रूपात पूजा केली जाते. मात्र, याच नद्यांची मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे. नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याने औद्योगिक कंपन्यां मधून बाहेर पडणारे सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळेही नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या काळ आणि सावित्री नद्यांनाही या प्रदूषणाची झळ बसली आहे. औद्योगिक क्षेत्रातील गावांचा विकास होत असताना मूलभूत कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था मात्र प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

Mahad River Pollution
Palghar Accident : ट्रिपल सीटचा बळी; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाड शहरालगतच्या गांधारपाले, मोहोप्रे, लाडवली, वहूर, शिरगाव, दादली यांसह अनेक गावांमध्येही कचरा नदीकिनारी टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. नदीकिनारी असलेली हॉटेल्स आणि मांसविक्रीची दुकाने यांच्याकडूनही निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नदीत टाकला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महाड शहरातील गांधारी पुलानजीक काही मांसविक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन करून कचरा नदीपात्रात टाकला जात असल्याची तक्रार आहे. पालिका प्रशासनाने यापूर्वी संबंधित विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या असल्या, तरी या कारवाईचा अपेक्षित परिणाम झालेला दिसत नाही.

नदीकिनारी असलेल्या भंगार विक्रेत्यांकडूनही सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या आणि कंपन्यांमधून आलेल्या रासायनिक पावडरच्या रिकाम्या पिशव्या साठवून ठेवल्या जातात. पावसाळ्यात या पिशव्यांमधील रासायनिक अवशेष पाण्याबरोबर नदीत मिसळण्याचा धोका निर्माण होतो. महाड तालुक्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले असून, स्वच्छतेच्या उपक्रमांत शहरानेही आपली कामगिरी नोंदवली आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता कचरा व्यवस्थापन आणि विघटनाची प्रक्रिया अनेक गावांमध्ये अद्याप प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसून येते. महाड शहराच्या परिघामध्ये असलेल्या सुमारे 25 पेक्षा जास्त ग्रामपंचायत मध्ये अशा पद्धतीने कचरा नदीकिनारी टाकला जात असल्याचे निष्पन्न झाल्याने यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.