

Mahad Minor Girl Assault Case
महाड: महाड तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात आज (दि. 19) तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बुधवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास महाड तालुक्यातील विलास पांडुरंग हुलालकर या 48 वर्षीय नराधमाने एका पाच वर्षीय बालिकेवर खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप निर्माण झाला होता. या घटनेनंतर आरोपीस पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटले आज सकाळी मोठा जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाला. त्यानंतर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालणार नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया केली जाईल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिले.