Raigad Liquor Seizure : महाड तालुका पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

१० लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Raigad Liquor Seizure
Raigad Liquor Seizurepudhari photo
Published on: 
Updated on: 

महाड : किल्ले रायगडच्या हिरकणी वाडीकडे जाणाऱ्या गाडीवर छापा मारून महाड तालुका पोलिसांनी लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली असता रायगड रस्त्यावर सापळा रचला आणि गाडीमध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई केली आहे.

गंगाराम अवकीरकर, लक्ष्मण अवकीरकर, सुरेश गोरे, राकेश कचरे सर्व राहणार हिरकणी वाडी या चौघां विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड - रायगड राष्ट्रीय महामार्ग जवळील चापगाव गावच्या हद्दीत पोलिसांनी इनोवा क्रिस्टा कारसह बियर आणि देशी दारू असा एकूण १० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

Raigad Liquor Seizure
Raigad News : विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड पायथ्याशी बेकायदेशीर दारू धंदा कोणाच्या आशीर्वादाने चालतो याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे. जप्त केलेली दारू अवैधरित्या किल्ले रायगडकडे नेली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Raigad Liquor Seizure
Janjira Vasai Fort : वसई किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वाराची दुरवस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.