Mahad Water Conservation: महाड आणि पोलादपूरमध्ये पाणीटंचाईचा धोका; पाण्याचे नियोजन करण्याची गरज

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला गती देण्याची गरज
Mahad Water Conservation
Mahad Water ConservationPudhari
Published on: 
Updated on: 

नाते: महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याची जपणूक करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रशासनाने आतापासूनच पाणीसाठ्याच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Mahad Water Conservation
Chaul Sheetalamata Temple: भक्तांना कौल देणारे चौलचे शीतलामातेचे जागृत देवस्थान

महाड-पोलादपूर परिसरात पावसाचे प्रमाण चांगले असले, तरी पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी पुरेशा उपाययोजना होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

ही परिस्थिती टाळण्यासाठी ग्रामीण भागात लहान मातीचे बंधारे, वनराई बंधारे आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होऊ शकते.

Mahad Water Conservation
Matheran Mini Train: माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावणार? १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान सेवा सुरू होण्याची शक्यता

पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास त्याचा परिणाम केवळ नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरच नव्हे, तर विकासकामांवरही होण्याची शक्यता आहे. विविध शासकीय बांधकामे, रस्त्यांची कामे आणि इतर विकासप्रकल्पांसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी उपलब्ध न झाल्यास ही कामे रखडण्याची किंवा त्यांच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसू शकतो. बांधकामासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास अनेक कामे थांबण्याची शक्यता आहे. परिणामी बांधकाम व्यावसायिकांसह गवंडी, मेस्त्री, बिगारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावरही परिणाम होऊ शकतो. कामे बंद पडल्यास अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

पाण्याचे स्रोत टिकवणे आवश्यक

प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करावे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबवून पाण्याचे स्रोत टिकवणे आवश्यक आहे.

आज पाण्याची जपणूक केली, तरच उद्याचे संकट टाळता येईल, याची जाणीव ठेवून महाड-पोलादपूरमधील नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news