Mahad municipal election : महाडमध्ये नवमतदारांसह परगावांतील मतदारांवर उमेदवारांची भिस्त

नगरपरिषदेसाठी 23 हजार मतदारांमध्ये तीन हजार नवमतदार; राजकीय पक्षांकडून लक्षणीय नोंदणी
Mahad municipal election
ईश्वरपूर, विटा, जत : महिला मतदारांचा टक्का अधिकFile Photo
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

सामाजिक व इतिहासिक क्रांतीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड नगरीच्या नगर परिषदेसाठी सुमारे साडेतीन वर्षानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता यावर्षी प्रथमच मतदान करणाऱ्या नव मतदार, व्यवसाय व नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या महाडकरांवर निवडणुकीच्या निकालांची संपूर्ण भिस्त राहील, असे स्पष्ट संकेत राजकीय जाणकारांकडून दिले जात आहेत.

महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता पंचरंगी लढत होत असून मुख्य लढत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व भारतीय जनता पक्ष युती यांच्यामध्ये आहे. महाडच्या इतिहासात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारासह प्रथमच दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने अनेक वर्षानंतर ही लढत पंचरंगी होत असल्याने संपूर्ण शहरासह तालुक्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्व पक्षांकडून अत्यंत उत्सुकतेने व गांभीर्याने पाहिले जात आहे.

Mahad municipal election
Maharashtra municipal elections : अडीच लाख मतदार ठरविणार पालिकांचे कारभारी

या निवडणुकीसाठी 23134 मतदारांची संख्या नोंदविण्यात आली असून यामध्ये नव मतदारांची संख्या सुमारे 3 हजारच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. शहराच्या विविध भागांतील तरुण-तरुणी तसेच लग्न झालेले आहे, मुले मुली नोकरी धंदा व्यवसायानिमित्त महाड बाहेर मुंबई, पुणे, ठाणे, सुरत या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्याशी ही सर्व पक्षांकडून केला जाणारा संपर्क लक्षात घेता व याबाबत महाडमधील यापूर्वीच्या निवडणुकांसाठी या मतदारांनी केलेल्या भरघोस मतदानाची टक्केवारी पाहता या दोन वर्गातील मतदारांवरच महाड नगर परिषदेवर झेंडा कोणाचा फडकणार हे स्पष्ट होणार आहे.

Mahad municipal election
Girgaon Chowpatty gymkhana : विल्सन जिमखान्यावर ‌‘आम्ही गिरगावकर‌’चा दावा

निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीपासूनच महाडमधील प्रमुख राजकीय पक्षांकडून नवीन मतदारांच्या नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाशी महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचे निदर्शनास आले मात्र त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील लक्षणीय मतदारांची नोंदणी केली आहे. या पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी मिळणारी मते ही निवडणुकीत निर्णायक ठरतील असा हा विश्वास या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

  • दोन अपक्ष असलेल्या उमेदवारांमध्ये एक उच्चशिक्षित असून या निवडणुकीतील या उच्चशिक्षित उमेदवाराकडे देखील महाडकर नागरिक कशा पद्धतीने पाहत आहात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोविड काळापासून या मान्यवरांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरांतील विविध प्रश्नांबाबत केलेल्या पाठपुराव्याचा आधार नगरपरिषदेतील या निवडणुकीसाठी प्राधान्याने घेतला जात आहे, हे लक्षात घेता या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा वापर देखील तेवढाच महत्त्वपूर्ण ठरेल हे स्पष्ट झाले आहे.

  • दुसरे अपक्ष उमेदवार देखील व्यवसायाने शहरात सर्वत्र परिचित असून त्यांना देखील मिळणारी मते ही विजयी उमेदवारासाठी अथवा क्रमांक दोनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. एकूणच महाड नगर परिषदेमध्ये मागील 30 वर्षाच्या कालखंडात प्रथमच शिवसेना व भाजपमध्ये झालेली मनभेदाची दूरी आगामी काळात भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या साथीने नगर परिषदेमध्ये किती संख्या बळ प्राप्त करून देते याकडे तसेच भाजपच्या ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने सत्ता आपल्या ताब्यात ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news